सिन्नर – नाशिक शिक्षण प्रसारकमंडळाचे शेठ ब.ना. सारडा विद्यालयातीलसन १९६४-६५ जुनी अकरावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावाशाळेच्या प्रांगणात शनिवारी संपन्न झाला. प्रथम सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक बापुसाहेब पंडीत व दिपक जाधव सर यांनी स्वागत केले. सर्व विद्यार्थी त्यांचे ११ वी चे वर्गात बेंचवर स्थानापन्न झाले. पर्यवेक्षक दिपक जाधव सर यांनी शाळेविषयी सर्व माहीती दिली, नंतर बापुसाहेब पंडीत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर माजी विद्यार्थ्याने आपआपले मनोगत व्यक्त करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. या नंतर माजी दिवंगत विद्यार्थी स्व.विश्वास गुजराथी,लालाशेठ चांडक,देवराम पन्हाळे,पांडुरंग कवडे ई. ज्ञात अज्ञात स्व.वर्गमित्रांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
सरते शेवटी सर्व माजी विद्यार्थ्यां तर्फे बापुसाहेब पंडीत व दिपक जाधव सरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. वरील स्नेह मेळाव्यास शाम जोशी, अनिल देशपांडे, पुंजाभाऊ सांगळे, डाॅ.हिरालाल परदेशी, अशोक शिरापुरे, सुरेश जाजु, वासुदेव काकड, राधाकृष्ण कौठे, हिरामण सोनवणे, चंद्रकांत गुजराथी, चंद्रकांत दराडे, दशरथ कापुरे, प्रकाश महेश्री, प्रकाश भावसार, अशोक घटे, विजुनाना गुजराथी, रामदास भांड, पांडुरंग पाटोळे वासुदेव गडाख हे हजर होते. शेवटी बापुसाहेब पंडीत यांनी सर्वांचे आभार मानले.