विकास सुरेश गिते
सिन्नर- सुमारे दोन वर्षांपासून संपूर्ण जगभरात कोविड प्रादुर्भावामुळे अनेक कार्यक्रमांवर सण उत्सव यात्रा यांच्यावर निर्बंध आणण्यात आले होते. यावर्षी सर्व निर्बंध खुले करण्यात आल्यानंतर अनेक सण वार उत्सव यात्रा सुरू झालेले आहे. सिन्नर तालुक्यातील व शहरातील प्रसिद्ध श्री ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या भव्य यात्रा येत्या शुक्रवारी १५ एप्रिल रोजी साजरी होत असून यात्रेची पूर्ण तयारी झाले आहे. या यात्रेत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक भाविक सहभागी होत असतात. नोकरीनिमित्त बाहेर गेलेले व माहेरवाशीण यादिवशी यात्रेसाठी हमखास येत असतात. त्यामुळे या यात्रेचे विशेष व आनंद सर्वदूर असतो. श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रे निमित्त संपूर्ण मंदिराला रंगरंगोटी व विद्युत रोषणाईने सजवले असून सागवानी लाकडापासून बनवलेल्या रथाची संपूर्ण रंगरंगोटी करण्यात आलेली आहेत.
सिन्नर मधील विडी कामगार यांच्या निधीतून हा रथ तयार केला आहे. या रथातून श्री भैरवनाथ महाराजांच्या मुकुटाची संपूर्ण शहरातून मिरवणूक काढण्यात येते स्वर्गीय ह. भ. प. श्री त्र्यंबक बाबा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी यात्रा उत्साहात साजरी करण्यात येते. यावर्षी ह.भ.प. पारायण त्र्यंबक बाबाभगत यांची उणीव सर्व सिन्नरकर यांना भासणार असून संपूर्ण सिन्नर तालुक्यातील महाराष्ट्र वैभवाचे स्थान या मंदिरांने निर्माण केले आहेत . सिन्नर मधील भजनी मंडळी रथाच्या मागे भजन गात असतात. यात्रेला व रथासाठी संपूर्ण सिन्नर शहरात सिन्नर नगरपालिका व सिन्नर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त मानाने प्रत्येक रस्त्यावर व चौकात तीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. त्यामुळे प्रत्येक हालचालीवर प्रशासन नजर ठेवून आहेत. ही यात्रा दिवाळी सणा सारखीच संपूर्ण शहराला असून यात्रेनिमित्त प्रत्येक घरासमोर व रस्त्यावर सुरेखशी रांगोळी काढण्यात येते. महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य प्रत्येक घरातून दिला जातो. रथाच्या मागे शेकडो कावडी धारक पहाटेच्या चार वाजेपासून तर सायंकाळपर्यंत अनवाणी पायांनी चालत असतात अनेक नागरिक व कुटुंब तसेच सामाजिक संस्था कावडी धारकांना प्रसाद व महिला कावडी धारकांचे पाय धुण पूजा करतात. तसेच प्रत्येक सिन्नरकर या यात्रेमध्ये सहभागी होऊन श्री भैरवनाथ यात्रेत उत्साहात भाग घेतात.
यामध्ये अनेक भाविक व भक्तजन भाग घेऊन अनेक सामाजिक संदेश व विविध प्रकारच्या कावडीद्वारे प्रबोधन सामाजिक संदेश सिन्नर भर देत असतात गंगेचे पाणी आणून देवाला अभिषेक केला जातो. तसेच रथ ओढण्यासाठी शेकडो बैलजोड्या शहरात येतात हा रथ सागवनी लाकडापासून बनवले आहेत. सिन्नर मधील विडी कामगारांकडून दिलेल्या निधीतून रथ तयार केला आहे. त्याला एकशे एक वर्ष पूर्ण झालेली असून हा रथ ओढण्यासाठी बैलजोड्या सज्ज करण्यात आलेले आहेत. नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय केदार व सिन्नर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक चौकात व रस्त्यावर सुमारे तीस सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. आहेत गुरुवारी रात्री मूर्ती अभिषेक व पूजन होणार असून यात्रेस प्रारंभ व सुरुवात होईल. शुक्रवारी पहाटे पासून रथाला सुरुवात ऊन सायंकाळपर्यंत श्री भैरवनाथ मंदिरातील शनिवारी सायंकाळी बारादरी येथील शेतात कुस्त्यांचा फड रंगणार आहे. अनेक पैलवानांची इथे हजेरी व कुस्ती बघण्यास मिळणार आहे. तसेच विजेते पैलवानांना रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. यात्रा उत्सव समितीचे शांततेने यात्रा उत्सव पार पाडावा असे आवाहन संयोजक मधुकर भगत सर, विलास महाराज भगत, कृष्णाजी भगत, चिंतामण भगत व नाशिक वेस मित्र मंडळाने केले आहे .तसेच नाशिक वेस, गंगावेस भैरवनाथ मंदिर, सरस्वती पुल, खासदार पुल भाजीविक्रेते रस्त्यावर बसणारे आणि फेरीवाली हातगाडीवाले आदींना सिन्नर नगरपालिका व पोलीस प्रशासनाने दुकाने न थाटण्याची आव्हान केले होते. तसेच अतिक्रमण केलेल्या दुकानांवर प्रशासनामार्फत कारवाई करण्यात आलेली आहेत सिन्नर नगरपालिका व सिन्नर पोलीस स्टेशन यांनी ही कारवाई केली असून शुक्रवारी भाजीबाजार बंद ठेवण्यात आलेला असून या सूचनेचे पालन सर्वांन करण्यास सांगितले आहे.