नासिक – सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील भरतपूर येथे कोळपेवाडी (जि. नगर) गावाच्या हद्दीवर सोमवारी (दि. ११) सकाळी लांडग्याच्या हल्ल्यात दोन्ही तालु्क्यात सात जण जखमी झाले. पहाटे ६ ते सकाळी ११ वाजेपर्यंत वेगवेगळ्या भागात, रस्त्यावर आणि मळे वस्त्यावर हल्ले करून जखमी केल्याचे पुढे आले आहे. या हल्यात अलका चांगदेव म्हस्के (४५), ताराबाई काशिनाथ थोरात (३५), विठाबाई अर्जुन नरोडे (६०), महेश विलास खालकर (२६), रावसाहेब सोमनाथ खरात (३५), वैष्णवी शरद आवारे (१९), गुलाब सलीम शेख (६५) हे जखमी झाले आहेत. त्यांना दुपारी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात सगळ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सिन्नरच्या पूर्व भागातील पुतळेवाडी येथे पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास विठाबाई अर्जुन नरोडे यांच्यावर झोपेत असतानाच लांडग्याने हल्ला केला. त्यांच्या तोंडावर व अंगावर चावा घेतल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर या प्राण्याने आपला पुढील मोर्चा भरतपुर विघ्नवाडी कडे वळवला सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याने रस्त्याने जाणार्या अनेक शेतात व रस्त्याने चालणार्या अनेक जणांवर हल्ला करण्यास प्रारंभ केला विघणवाडी भरतपूर येथे रस्त्याने चालत असताना ताराबाई काशिनाथ थोरात (वय ६०) अलका चांगदेव महस्के यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. या तिघांवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर या लांडग्याने वेणू बाई महादेव थोरात विमलबाई विष्णू डुबे ,शाहीद जमाल सैय्यद हा काॅलेज विद्यार्थी आहेत यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. सुरुवातीला हा कोणता वन्यप्राणी आहे याबाबत सर्वीकडे चर्चेला उधाण आले होते. मात्र ज्यांनी प्रत्यक्ष हा लांडगा असल्याचे दिसून आले व हा लांडगाच आहेत हे सर्वाना समजले. त्यानंतर जवळच असलेल्या शेजारील कोपरगाव तालुक्यातील त्याने आपला मोर्चा वळवला तेथील एकाला चावा घेतल्याचे समजते. तसेच सिन्नरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचारी येथील गावात जाऊन पाहणी केली.
जखमी उपचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी दाखल
सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील भरतपुर विघ्नवाडी व पुतळेवाडी तसेच शेजारील तालुक्यातील कोपरगाव या गावांमध्ये या लांडग्याने अनेकांना चावा घेतल्याने सर्वांना उपचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सकाळपासूनच या लांडग्याने अनेकांना चावा घेण्याचे सत्र सुरू ठेवले होते. त्यामुळे अनेक जण दहशतीखाली होते. त्यात पहाटे बाहेर झोपलेल्या महिलावर हा लांडग्याने जोरदार हल्ला केला व जखमी केले. अशाच प्रकारे या लांडग्याने आपला मोर्चा अनेक नागरिकांवर वळवित त्यांना जखमी केले