सिन्नर – तालुक्यातील नायगाव शिवारात रविवारी सकाळी विद्युत तारांचे घर्षण होऊन सुमारे अडीच एकर ऊस जळून खाक झाल्याची ही घटना घडल्याने शेतकरी वर्गावर मोठे संकट ओढवले आहे. सिन्नर तालुक्यातील नायगाव शिवारातील सुमारे अडीच एकर ऊस जळून खाक झाला. या ऊसातील शेतांमधील तीन शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून यामधील गोपाळ भिमराव जेजुरकर यांच्या शेतातून जाणाऱ्या विद्युत तारांवर पाखरे बसल्याने तारांचे घर्षण होऊन त्यातून पडलेल्या घर्षण द्वारे उसाच्या शेतात ठिणगी पडली. व पिकाने पेट घेतला. जोराचा वारा वाहत असल्याने. अवघ्या काही मिनिटातच शेजारीच असलेल्या सोपान तुकाराम भांगरे व संजय कचेश्वर जेजुरकर तसेच दिगंबर अंबादास जेजुरकर यांच्या शेतातील उभ्या असलेल्या उसाला आगीने पेट घेतला.
यामध्ये सोपान भांगरे या शेतकऱ्यांची सर्वाधिक अडीच बिघे एकर ऊस जळून खाक झाला व लाखोंचे नुकसान झाले. जोराच्या वार्यामुळे व दुसऱ्या बाजूने शेजारील ग्रामस्थांना आग विझविण्यात यश आले. जवळच विहिरीतील पाणी चालू असल्याने तेथील युवकांनी पुढे जाऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अनेक दिवसांपासून उभ्या पिकात आगीचे सत्र सुरू असून मागील काही दिवसात नांदुर-शिंगोटे, दातली तसेच सिन्नर शहरात विद्युत वाहिनीच्या उच्च दाबामुळे व अचानक शॉट सर्किटमुळे अनेक शेतकऱ्यांची ऊस जळाले होते. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. परत आज तशीच पुनरावृत्ती नायगाव शिवारात घडल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. या शेतकरी वर्गाच्या जमिनीमध्ये विद्युत खांब अनेक दिवसांपासून वाकल्याने त्या तारा थोड्या खाली आले असून महावितरण विभागाला व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी माहिती देऊनही कर्मचाऱ्यांनी कोणते प्रकारचे दुरुस्ती केली नसल्याचे शेतकरी वर्गाने सांगितले. तसेच सदर घटनेनंतर घटनास्थळी महावितरण कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जाऊन पाहणी केली.