सिन्नर – सिन्नर तालुक्यातील पंचाळे ग्रामपंचायत सदस्य महेश थोरात यांना गावपातळीवर करत असलेल्या कामासाठी प्रगती महिला, शैक्षणिक, सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्याकडून राज्यस्तरीय ग्रामभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विशेषतः ग्रामपंचायत सदस्य म्हणून थोरात यांनी एक वर्षात केलेल्या कामांची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली.
कोरोना काळात गावातील व्यवसायिकांना स्वखर्चाने सॅनिटायझर्स, मास्क वाटप, स्वखर्चाने गावात जंतुनाशक फवारणी, मुख्य रस्त्यांना स्वखर्चाने पथदीप लावून लाईटची व्यवस्था, स्मशानभूमी मध्ये स्वखर्चाने डागडुजी, गावात तलाठी, सरकारी दवाखान्यात डॉक्टर, कृषी सहाय्यक उपलब्ध राहावे यासाठी पाठपुरावा, गावातील बंद स्थितीतील हातपंप दुरुस्ती, आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्यासाठी लोकवर्गणी जमा करून पाण्याची टाकी, मळे परिसरात खासदार गोडसे यांच्याकडे पाठपुरावा करून हातपंप मंजुरी, गावात पोलीस दुरक्षेत्र व्हावे यासाठी पाठपुरावा, पूर्व भागातील शेतकऱ्यांची जलसंजीवनी असलेल्या कडवाला आवर्तन सुटावे म्हणून पाठपुरावा, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून पंचाळे देवपूर राज्य मार्गावरील खड्यांची दुरुस्ती, गतिरोधकांवर रिफ्लेकटर, महितीदर्शक बोर्ड लावणे, स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या युवकांना आणि अभ्यासिकांना पुस्तक दान उपक्रमातून पुस्तके, समाज मंदिर, शाळा आणि अभ्यासिका यांना रंगकामासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे, दिव्यांग बांधवांना थंडी पासून ऊब मिळावी म्हणून ब्लॅंकेट वाटप, वृक्षारोपण, विविध शासकीय योजना आणि अनुदान तळागाळातील ग्रामस्थांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न.
याशिवाय विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून देखील थोरात हे गेली अनेक वर्षे ग्रामीण भागात लोकोपयोगी कामे आणि विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत.आदी कामाच्या माध्यमातून केलेल्या कामाची दखल घेत त्यांची निवड करण्यात आल्याचे प्रगती संस्थेचे सचिव साहित्यभूषण महेश मुळे यांनी माहिती दिली. लवकरच मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.