सिन्नर – तालुक्यात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील तसेच अनेक ग्रामीण भागातील मंदिरांमध्ये राम नवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सिन्नर शहरातील श्रीराम मंदिर, साईबाबा मंदिर, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आदी मंदिरात रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अनेक श्रीराम मंदिरावर आकर्षक रोषणाई आणि चौकाचौकांमध्ये भगव्या पताका लावल्या होत्या. कोरोना संसर्गाच्या दोन वर्षांनंतर सार्वजनिक उत्सव साजरा करण्यात येत असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.
रविवारी शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले. गत तीन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्ती गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. रविवार १० एप्रिल रोजी सकाळी 12:39 वाजता श्री राम जन्मो उत्सव साजरा करण्यात आला. तसेच विविध कार्यक्रमांनी व नामघोषाने जय श्रीराम हे नामस्मरण करण्यात आले.रामजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
सिन्नर शहरातील राम मंदिरातील श्री रामाचा रथ हा एकादशीच्या दिवशी सिन्नर शहरात काढण्यात येणार असून या रथाच्या उत्सवासाठी अनेक भक्तजन परिश्रम घेत आहे. तसेच सिन्नर शहरातील अनेक मंदिरात श्रीराम जन्मोत्सव निमित्त मंदिराला फुलांचा आरसा तसेच विविध रोषणाई करण्यात आली होती. रविवारी दुपारी बारा एकोणचाळीस वाजता श्री स्वामी समर्थ मंदिर, श्री राम मंदिर, श्री साईबाबा मंदिर या ठिकाणी राम जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. आरती व नैवेद्य श्रीराम देवतेला दाखवण्यात येऊन प्रसादाचा लाभ अनेक भाविकांनी घेतला. श्रीराम मंदिरात दर्शनासाठी अनेक भाविकांची सकाळपासून मांदियाळी दिसून येत होती. श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग केंद्र सिन्नर येथे सकाळी दुर्गा सप्तशती पाठ घेण्यात आला. यावेळी या कार्यक्रमासाठी अनेक महिलांनी सहभाग घेऊन श्रीराम नवमी चा जयघोष केला तसेच श्री राम रक्षा स्तोत्र तसेच श्री राम जन्माची कथा श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास सेवा केंद्र सिन्नर येथील सचिन गुंजाळ यांनी आपल्या मनोगतातून श्रीराम जन्मोत्सव कथा सांगितली या कार्यक्रमासाठी अनेक भक्तजन उपस्थित होते.