सिन्नर – शहरात दलित वस्ती सुधार योजनेतून आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांतून ९७ लाख ५६ हजार रुपयांची विकास कामे मंजूर झाली आहे. सिन्नर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांमार्फत तत्कालीन नगरसेवक नामदेव लोंढे व मालती भोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दलित वस्ती सुधार योजनेतून शहरातील कामे मंजूर होण्यासाठी प्रस्ताव दाखल केले होते.२४ मार्च रोजी पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार माणिकराव कोकाटे यांनी या कामांना मंजुरी देण्याची मागणी केली होती.त्यानुसार जिल्हा नियोजन समितीत निधीच्या समप्रमाणात या कामांना मंजुरी देण्याचा निर्णय संमत झाला होता.जिल्हाधिकारी गंगाधरण डी यांनी नुकतीच पाच कामांना मंजुरी दिली आहे.ज्यामुळे सिन्नरच्या विकासात भर पडणार आहे.
ही कामे होणार…
प्रभाग १४ मध्ये भाऊसाहेब लोंढे ते पोपट गोळेसर घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी १५ लाख ८५ हजार ९३३ रुपये, दत्तू जाधव ते हरिभाऊ जगताप घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ५ लाख ९३हजार ७९ रुपये,मल्हारी जाधव ते अशोक घेगडमल घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे ६ लाख २ हजार ४२७ रुपये,प्रभाग ३ मध्ये हॉटेल निमंत्रण ते बेलोटा कंपनीपर्यंत पाईप गटार बांधण्यासाठी ५३ लाख ३२ हजार ३८५ रुपये व शंकरनगर भागात रस्ता काँक्रीटीकरण व पाईप गटार बांधकाम करण्यासाठी १६ लाख४२हजार २४९ रुपये निधी मंजूर झाला आहे.पाच कामांसाठी एकूण ९७ लाख ५६ हजार ७३ रुपये निधी मंजूर झाला आहे.आमदार कोकाटे यांनी निधी मंजूर करून आणत विकास कामांची मंजुरी मार्गी लावल्याने या भागातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
विकासाला गती मिळणार
आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे आम्ही विरोधी गटातील नगरसेवकांनी विकास कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला होता.ती मार्गी लागल्याने सिन्नरच्या विकासाला गती मिळणार आहे.
नामदेव लोंढे, माजी नगरसेवक सिन्नर