सिन्नर – शहरातील गोसावी समाज तसेच महानुभव पंथ समाजाच्या स्मशानभूमीचे काम नगर परिषदेमार्फत सुरू आहे. सदर काम ५० टक्के पूर्ण झाले असून, माजी आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे यांनी या कामाची पाहणी केली.
स्मशान भूमीचे काम होण्यासाठी गोसावी समाज व महानुभव पंथ समाजबांधवांनी मा आमदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे मागणी केली होती. त्यातील तांत्रिक अडचण सोडवून ऐश्वर्य गार्डन च्या मागील बाजूस काम सुरू आहे,हे काम आता ५० टक्के पूर्ण झाले आहे. या कामाची पाहणी माजी आमदार राजाभाऊ वाजे,नगराध्यक्ष डगळे यांच्यासह गटनेते हेमंत वाजे,गोसावी समाज तालुकाध्यक्ष भानुदासपुरी गोसावी, सरचिटणीस वसंत गोसावी यांनी पाहणी करत कामाबद्दल समाधान व्यक्त केले.