सिन्नर – सिन्नर सार्वजनिक वाचनालयात वाचनालयाचा ७६ वा वर्धापन दिन वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांचे अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रंथपुजन वाचनालयाच्या संचालिका सौ. प्रज्ञा देशपांडे व प्रशांत देशपांडे यांचे हस्ते करण्यात आले. गेल्या पंचविस वर्षापासून गंगावणे परिवार वर्धापन दिनी वाचनालयात येवून वाचनालयास ग्रंथसंपदा भेट देत असतात कोरोना कालावधीत त्यांना येता आले नसल्याने यंदा सुधीरजी गंगावणे व स्वाती गंगावणे हे वाचनालयाच्या वर्षापन दिनी उपस्थित राहून वाचनालयास ३० हजार ५८३ रू. किमतीचे ११६ पुस्तके सप्रेम भेट देवून त्यांनी पुस्तक देणगीचा उपक्रम सुरू ठेवला आहे. त्यांनी आजपर्यंत सहा लाखहून अधिक रक्कमेची पुस्तके वाचनालयास भेट दिली.
वाचनालयाचा ग्रंथविभाग व कार्यालयाचे नवीन स्वरूप पाहून सुधीरजी गंगावणे यांनी अध्यक्ष व संचालक मंडळाचे कौतुकास्पद केले. अध्यक्ष कृष्णाजी भगत यांचे हस्ते सुधीरजी गंगावणे यांचा व प्रज्ञा देशपांडे यांचे हस्ते स्वती गंगावणे यांचा सत्कार करण्यात आला. सुरेशजी देशपांडे व सौ. स्वाती सुरेश देशपांडे त्यांनी के. दिगंबर अनंत देशपांडे यांचे स्मरणार्थ वाचनालयास ११ हजार रूपये देणगी दिली. सुरेशजी देशपांडे यांचा सत्कार वाचनालयाचे उपाध्यक्ष पुंजाभाऊ सांगळे यांचे हस्ते करण्यात आला. तसेच वाचनालयाचे सभासद श्री बबनराव वाजे यांनी देखिल वाचनालयाच्या वर्धापन दिनी वाचनालयास ११ हजार रुपये देणगी दिली. त्याचा सत्कार वाचनालयाचे उपाध्यक्ष नरेंद्र वैद्य यांचे हस्ते करण्यात आला देणगीदांचे व वर्धापन दिनी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार वाचनालयाचे संचालक जितेंद्र जगताप यांनी मानले. वाचनालयाचा अमृत महोत्सव वर्षाला आज पासून सुरुवात झाली. असुन व्याख्यानमाला विविध प्रकारच्या सांसकृतिक, ज्ञानवर्धक आणि रंजक स्पर्धा, वाचक वृध्दीसाठी प्रयत्न कवी संमेलन कार्यक्रमांचे आयोजन वर्ष भरात केले जाणार आहे. या कार्यक्रमांना वाचक, सभासद देणगीदार व सिन्नर करांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांनी केले आहे. कार्यक्रमास चंद्रशुखर कोरडे मनिष गुजराथी, सुनिल उगले, शामसुंदर झळके, वामनराव उकाडे, रविंद्र गुजराथी, सुरेश गुजराथी, आदी मान्यवर उपस्थित होते.