सिन्नर – माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या प्रती कृतज्ञता म्हणून तसेच ज्या शिक्षकांमुळे आपण आज योग्य स्थानी असून त्या शिक्षकांच्या प्रति एक भावनिक साद देत त्यांच्या ज्ञानातून उतराई होण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून सन १९९६ ते ९७ बँचच्या माजी विद्यार्थ्यांनी लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे या ज्ञान संकुलात शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कहांडळ यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्त शाळेला दहा डेस्क देण्यात आले. या छोटेखानी लोकार्पण सोहळय़ात मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, सिन्नर तालुक्याचे संचालक हेमंत नाना वाजे व संस्थेचे सभासद शालेय समिती सदस्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .यावेळी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या प्रति व शाळेसाठी जे काही मदत केली असून ती खरंच वाखाणण्याजोगी सारखी आहे. त्यांची इतरांनीही आदर्श घ्यावा तसेच हे माजी विद्यार्थी आपल्या प्रत्येक क्षेत्रात उच्च स्थानावर असून त्यांचे हे कार्य सामाजिक असल्याचे गौरवोद्गार मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी सांगितले. मविप्रचे संचालक हेमंत नाना वाजे यांनी हे माजी विद्यार्थी यांचे कार्य सतत संस्थेसाठी तसेच समाजासाठी सतत अग्रेसर असतात माजी विद्यार्थ्यांनी सर्वांनी एकत्र येऊन संस्थेसाठी जी काही मदत केली आहे. त्याचा योग्य ठेवा शालेय तसेच संस्था घेईल. तुमचे कार्य पुढील पिढीसाठी सतत प्रेरणादायी आहे असे उद्गार काढले. या शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत कहांडळसर यांनी आपले माजी विद्यार्थी यांच्याप्रती बोलताना असे सांगितले की, हे माझे विद्यार्थी खरंच प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेत असून त्यांनी जी शाळेसाठी मदत केलेली आहे. ते कार्य हे उच्च कोटीचे असून त्यांची सतत मदत ही शाळेसाठी होत असते. दर दोन वर्षांनी हे माजी विद्यार्थी शाळेच्या गरीब विद्यार्थ्यांसाठी व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालेय गणवेश देत असतात. त्यांचे हे कार्खरंच समाजाच्या प्रति व आमच्यासाठी प्रेरणादायी आहे असे उद्गार काढले. यावेळी माजी विद्यार्थी रतन नाठे, अमोल खैरनार, अजित रायते,संतोष उगले,निरज कुलकर्णी, विक्रम व्यवहारे, मनोज गायकवाड ,दीपक कोतवाल, विवेक कोकाटे ,विकास गिते गणेश आखाडे ,दत्ता चव्हाणके, कैलास नवले आदी उपस्थित होते.
असे करतात माजी विद्यार्थी उपक्रम
लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयचे माजी मुख्याध्यापक कहांडळसर यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त सन १९९६ ते ९७ बँचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रति जी काही मदत केली. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या प्रति तसेच आजी विद्यार्थ्यांसाठी फुल नाही फुलाची पाकळी तरी देण्याचे ठरवले. यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी मदत करत दहा डेस्क शाळेला दिले. गेल्या दोन वर्षांपूर्वी सुमारे २० ते २५ होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्यात आले होते. यावर्षीसुद्धा गरीब विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे ठरविले असल्याचे माजी विद्यार्थ्यांनी सांगितले.