सिन्नर – नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच काळा काळा कापूस पिंजला रे ढगांशी वारा झुंजला रे हे गाणं प्रत्येकाने आपल्या आजीच्या आईच्या किंवा शिक्षकाच्या शिकवण्या द्वारे ऐकले आहे. किंवा पाठ्यपुस्तकात ही आपण त्याची अनुभूती घेतली आहे. पण खरंच जर मोर आपल्या दारात आपल्या अंगणात आला तर किती ते दृश्य मनोहर असेल. हे प्रत्येकाला स्वर्ग अनुभूती असल्यासारखे वाटते. निफाड तालुक्यातील तामसवाडी या गावात स्व. दत्तू नरहरी आरोटे यांच्या वस्तीवर सकाळच्या सांज झुंज मुनल्या प्रहाराच्या वेळी अंगणात येऊन कुकू कुकू असा आवाज देऊन. सर्वांना हवेहवेसे करतो. असा मोर त्यांच्या घराच्या पत्र्यावर मनसोक्त पिसारा फुलवून विहार करताना आरोटे कुटुंबीयांनी बघितल्यानंतर कुटुंबियांना प्रचंड आनंद झाला.
एक पक्षी आपल्या घराच्या द्वारी येऊन बागडताना दिसत असताना घरातील चिमुकले यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. कारण पुस्तकात बघितलेला मोर आज प्रत्यक्ष आपल्या अंगणात आला. कविता द्वारे शिक्षकांनी शिकवले आहे नाच रे मोरा नाच त्याच धर्तीवर आज या मोराने पिसारा फुलवला. त्यावेळेस आरोटे कुटुंबियांना स्वर्ग गगनात मावेनासा झाला. आरोटे कुटुंबियातील वैभव आरोटे ,खुशाल आरोटे, वैशाली आरोटे, पौर्णिमा आरोटे, यांच्या मनात एक रान पक्षी आपल्या दारी आल्याने त्याला पाहून धान्य व पाणी दिले. तसेच उन्हाळ्याचे दिवस वाढत असताना अशा वेळेस हे पक्षी मानव अधिवासाकडे आपला मोर्चा वळवतात. त्यांना अन्न पाणी देणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचे वैभव आरोटे यांनी सांगितले. आत्तापर्यंत मोर हे रानावनात दिसत होते. तसेच शेतातील अनेक पिकातही मोर नाचताना दिसत होते. पण ते दुरून बघितले आहे. पण आज प्रत्यक्ष मोर घराकडे येऊन आपल्या पिसारा द्वारी सर्वांना हवेहवेसे केले. पंधरा ते वीस मिनिटात या मोराने सर्वीकडे स्वच्छंद असा विहार करून कु कु आवाजाद्वारे चिमुकल्यांना जवळ केले व काही वेळाने हा मोर रानाकडे निघून गेले असे आरोटे कुटुंबियांनी सांगितले.
आपण पशुपक्ष्यांवर भूतदया करूया
तामस वाडी हे गाव गंगेच्या किनारी असून येथे सतत अनेक प्राण्यांचा अधिवास असतो मोर हा राष्ट्रीय पक्षी असून लहानपणापासून आमच्या शेतात तसेच गावांतील रानावनात मोर हा पक्षी आम्ही बघत आलेल आहोत पण आज अचानक आमच्या वस्तीवर मोर आल्याने सर्व आवक झाली कारण उन्हाळ्याचे दिवस चालू असल्याने हे रानातील पक्षी आता मानव वस्तीकडे येत आहे त्यांना अन्न पाणी देणे हे आपले आद्य कर्तव्य असून घराच्या बाहेर एका भांड्यात पाणी ठेवून आपण पशुपक्ष्यांवर भूतदया करूया अशी भावनिक साथ मी प्रत्येक मनुष्याला देत आहे.
खुशाल दत्तात्रय आरोटे