सिन्नर – सिन्नर शहरास पाणीपुरवठा करणारी कड़वा योजनेची ६०० मी.मी व्यासाची मुख्य जलवाहिनी आगास खिंड गावातील साईबाबा मंदिरा जवळ १ एप्रिल रोजी सकाळी ७ च्या सुमारास लीक झालेली असल्याने सिन्नर शहरास होणारा पाणीपुरवठा एक दिवस विलंबाने होणार असल्याचे नगर परिषदेने पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. २ एप्रिल रोजी दुपार नंतर पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. या बाबतीत पाणी पुरवठा विभागातर्फे तात्काळ लिकेज काढण्याची कार्यवाही सुरू झालेली असून नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी उपलब्ध पाण्याचा संचय करून ते जपून वापरावे. असे नगरपरिषदेने प्रसिद्धि पत्रकात सांगितले आहे. दरम्यान ही पाईपलाईन पुन्हा अगसखिंड शिवारात फुटल्याचे वृत्त आहे. याचे कामही प्रगतीपथावर आहे.










