सिन्नर – वडांगळी विकास संस्थेच्या अध्यक्षपदी रामनाथ खुळे तर उपाध्यक्षपदी संपत खुळे यांची बिनविरोध निवड झाली. महिनाभरापूर्वीच या संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक अविरोध झाली होती. आमदार माणिकराव कोकाटे गटाचे नेते व ग्रीन व्हिजन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष सुदेश खुळे, शिवाजी आप्पा खुळे त्याचबरोबर माजी आमदार राजाभाऊ वाजे गटाचे नेते शिवसेना उपजिल्हा प्रमुख दीपक खुळे यांनी आपसात चर्चा करून ही निवडणूक बिनविरोध केली. यावेळी सुदेश खुळे गटाचे १० तर दीपक खुळे गटाचे ३ संचालक निवडण्यात आले.सर्वसाधारण गटातून रामनाथ रुंजा खुळे,संपत बाबुराव खुळे,तुळशीराम विठोबा खुळे, दीपक गोरक्षनाथ खुळे,शंकर संपत खुळे,योगेश सुरेश खुळे,सचिन नामदेव खुळे,लक्ष्मण बाळा खुळे महिला राखीव गटातून सौ.शीला विजय खुळे व रेखा रावसाहेब खुळे,इतर मागास वर्ग गटातून गणेश पोपट कडवे,अनुसूचित जाती जमाती गटातून संतोष सोपान आढांगळे व भटक्या विमुक्त जाती जमाती मधून रामनाथ विठोबा कांदळकर यांची अविरोध निवड झाली होती.
आज संस्थेच्या कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची सभा निवडणूक अध्यासी अधिकारी आर.बी.त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी संचालक मंडळाने आपापसात बैठक घेत अध्यक्षपदासाठी रामनाथ खुळे व उपाध्यक्षपदासाठी संपत खुळे यांच्या नावावर एकमुखी शिक्कामोर्तब केले होते.त्यामुळे या दोघांनीच नामनिर्देशन पत्र भरले.त्यामुळे अध्यासी अधिकाऱ्यांनी या दोघांची अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून अविरोध निवड झाल्याची घोषणा केली.त्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षांसाह सर्व नवनिर्वाचित संचालकांचे सत्कार करण्यात आले.कैलास खुळे,संचालक लक्ष्मण खुळे, निवडणूक अधिकारी आर.बी.त्रिभुवन व सुदेश खुळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रीन व्हिजन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक शिवाजी खुळे,खरेदी विक्री संघाचे संचालक नितीन आढांगळे,खंडेराव खुळे,टीचर्स सोसायटीचे कार्यवाह नानासाहेब खुळे,रावसाहेब खुळे,गणेश खुळे,नाना खुळे,माजी अध्यक्ष बाळासाहेब खुळे, माजी उपाध्यक्ष नारायण कांदळकर,सचिन खुळे,उत्तम खुळे,विलास उगले,सुनील चतुर आदी उपस्थित होते.
संस्थेचा लौकिक वाढवावा…
संस्थेत ज्येष्ठ आणि तरुण संचालक मंडळ निवडले गेले आहे.संस्थेने विविध व्यवसाय करण्याबरोबरच अल्पठेव योजना, अल्पकर्ज वाटप यांसारख्या योजना आगामी काळात राबवून संस्थेची भरभराट करून तिचा लौकिक वाढवावा अशी अपेक्षा सुदेश खुळे यांनी यावेळी संचालक मंडळाला शुभेच्छा देतांना व्यक्त केली.