सिन्नर : सोनांबे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार राजाभाऊ वाजे समर्थकांनी शिवसेनेचा भगवा फडकावला आहे. सरपंच डॉ. रवींद्र पवार, तानाजी पवार, रामनाथ डावरे, दामूअण्णा बोडके यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा विकास पॅनेलने १३ पैकी ११ जागांवर दणदणीत विजय मिळवत सत्ता प्रस्थापित केली. तर आमदार कोकाटे समर्थक केरु पवार यांच्या नेतृत्वातील समर्थ पॅनलला केवळ एक जागा मिळाली. जनसेवाचे भट्क्या जाती, विमुक्त जमाती, विशेष मागास प्रवर्गातून रामभारती गोसावी हे बिनविरोध निवडून आले होते.
समर्थ पॅनेलचे अनुसुचित जात/जमाती राखीव गटातील गोविंद डगळे (३४९) यांनी जनसेवाच्या दत्तू डगळे (३२८) यांचा २१ मतांनी पराभव केला. दरम्यान सर्वसाधारण गटात जनसेवाचे पंडीत घोडे (३५८), रामनाथ डावरे (३४८), तानाजी पवार (३४२), ज्ञानेश्वर बोडके (३३९), ज्ञानेश्वर पवार (३३४), प्रविण पवार (३२४), सुरेश पवार (३२३) यांचा विजय झाला. तर समर्थ पॅनलचे यादव घोडे (२५५), एकनाथ कडभाने (२९६), उत्तम जगताप (२७०), भाऊसाहेब पवार (२८६), पुंजा पवार (३०२), सदाशिव पवार (२९५), वामन पवार (३०४), पीर अहमद पठाण (२६७) यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. इतर मागास प्रवर्गातून जनसेवाचे खंडू पवार (३४८) विजयी झाले. त्यांनी समर्थ पॅनलचे जनार्दन पवार (३३२) यांना पराभवाची धूळ चारली. महिला राखीव गटात जनसेवा पॅनलच्या राधाबाई पवार (३५१) द्रौपदाबाई बोडके (३३५) विजयी झाल्या तर समर्थ पॅनलच्या पुष्पाबाई बोडके (३२५), मिराबाई पवार (२८७) पराभूत झाल्या.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनिता लोखंडे यांनी काम पाहिले. दरम्यान, पॅनलच्या यशासाठी सुभाष जोरे, विकास पवार, अनिल पवार, योगेश पवार, संतोष डगळे, सोमनाथ पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी मेहनत घेतले. कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.