सिन्नर : पांगरी बुद्रुक येथील विविध विकास कार्यकारी सहकारी सेवा सोसारटीची २०२२-२७ साठीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. १३ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत मागील पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे याहीवेळी किसान प्रगती पॅनलने ११ जागा जिंकत विजयचा गड शाबूत राखला. शेतकरी विकास पॅनलचा अवघ्या दोन जागा मिळाल्या.
पगार, कलकत्ते, कांडेकर, शिंदे, अभंग, निकम, निरगुडे आदी कुळींनी एकत्रित येत शेतकरी विकास पॅनलला कडवे आव्हान उभे केले होते. किसान प्रगती पॅनलकडून अनेक नवोदित चेह-यांना उमेदवारीची संधी देण्यात आली होती. या निवडणुकीत १३ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात उतरले होते. सर्वसाधारण मतदार संघासाठी आठ जागा होत्या. यात आत्माराम पगार (३७५), कैलास निरगुडे (३५६), संदीप शिंदे (३५५), विलास कलकत्ते (३५२), दिनकर हासे(३३८), दामोधर कांडेकर (३३२) हे किसानचे तर रभाजी पगार (३६१) व विलास पांगारकर (३२९) हे शेतकरीचे दोनच उमेदवार विजयी झाले.
विमुक्त जाती-भटका जमाती विशेष मागास प्रवर्गातून किसान प्रगतीचे रोगेश गोसावी रांनी ३८१ मते घेत राजू डुकरे यांचा पराभव केला. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून किसान प्रगतीच्रा विजर अभंग यांनी ३६१ मते घेत अशोक निकम व हेमंत निकम यांचा पराभव केला. महिला राखीव मतदार संघातून मिराबाई पगार (३५५), विजरा पगार (३५२) यांनी पद्माबाई शिंदे आणि अलका सालके यांचा पराभव केला. इतर मागास प्रवर्गातून संभाजी पगार यांनी मताधिक्य घेत परसराम पगार यांचा पराभव केला.
किसान प्रगती पॅनलकडून गुलाल उधळून विजयत्सोव साजरा करण्यात आला. श्री संत हरीबाबा मंदिरात विजयी उमेदवारांचा ग्रामस्थांनी सत्कार केला. १३ पैकी ११ जागांवर वर्चस्व आमदार माणिकराव कोकाटे गटाचे पंचायत समिती सदस्य रवी पगार, तालुका दुध सघांचे व्हा. चेअरमन विठ्ठल पगार, सोसायटीचे माजी चेअरमन विश्वनाथ पगार, उपसरपंच बाबासाहेब पगार, व्हा. चेअरमन संजय वारुळे, जगन्नाथ पगार, धनु निरगुडे, निलेश पगार, निवृत्ती दळवी, राजु पगार यांच्या नेतृत्वाखाली किसान प्रगती पॅनलने १३ पैकी ११ जागांवर विजय मिळविला. तर, विलास पांगारकर, रमेश पांगारकर, ज्ञानेश्वर पांगारकर, सुरेश पांगारकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत पराभव झाला.