सिन्नर: नाशिक- पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भाटवाडी येथील युवक ठार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखन रतन गवारे (२६) हे अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. गवारे हा दुचाकीने भाटवाडी येथून माळेगाव औद्योगिक वसाहतीकडे जात असतांना नाशिक-पुणे महामार्गावर लोणारवाडी शिवारात अज्ञात वाहनाने त्यास धडक दिली होती. या अपघातात त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हवालदार पाटील अधिक तपास करीत आहेत.
७४ वर्षीय वृध्दाचा मृत्यू
सिन्नर: तालुक्यातील वडझिरे येथील ७४ वर्षीय वृध्दाचा अचानक छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात नेण्यापूर्वी मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चंद्रभान सावळीराम नागरे (७४) यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना उपचारासाठी सिन्नरच्या खासगी रुग्णालयात घेऊन जात असतांना त्यांचा मृत्यू झाला. मुलगा संदीप नागरे यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खबर दिली. अधिक तपास हवालदार एम. एस. मानकर करीत आहेत.