सिन्नर – सिन्नर सहयाद्री युवामंच आशापुर सिन्नर येथील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत प्रथम बक्षीस – जायगांव संघ २१,०००, द्वितीय बक्षीस- म्हाळुंगी संघ- १५,०००, तृतीय बक्षीस- भाटवाडी संघ, सिन्नर -९,००० रुपये ,चतुर्थ बक्षीस – नायगांव संघ- ९,००० रूपये यांना मिळाले. या विजेता संघांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले. आठ दिवस चाललेल्या या स्पर्धेत ४२ संघ सहभागी झाले होते.
विजेता संघाना बक्षिस शिवसेना युवानेते उदय सांगळे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस बी देशमुख, डॅा. अंकुश आव्हाड, डॅा. योगेश आव्हाड ,पाडळीचे मा. सरपंच चंद्रभान रेवगडे टेंभुरवाडी ( आशापुरच्या ) पोलिसपाटील सौ .भाग्यश्री पाटोळे, धनंजय रेवगडे, सुभाष घुगे, गिरी आर .टी , रेवगडे टी .के ,पाटोळे सर, भाऊराव पाटोळे, पालवे, अमोल पाटोळे यांच्या हस्ते देण्यात आले. हा कार्यक्रम शनिवार पाडळी ,पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या भव्य प्रांगणात संपन्न झाला.
प्रायोजक म्हणुन सहयाद्री युवा मंच सिन्नर उदयभाऊ सांगळे, स्पर्श हॉस्पीटलचे संचालक डॉ. योगेश आव्हाड व डॉ . अंकुश आव्हाड ,यांनी सहकार्य केले. यावेळी आशापुर प्रिमियर लिगचे पदाधिकारी भाऊराव पाटोळे, अक्षय सांगळे, संतोष शिंदे , रावसाहेब पाटोळे , अमोल पाटोळे , पांडुरंग पाटोळे , आप्पा थोरे , गोकुळ पाटोळे , सतीष सांगळे मच्छिंद्र पाटोळे , तेजस सांगळे , दत्तु गोसावी , शुभम पाटोळे, वैभव पाटोळे , साईनाथ पाटोळे , शुभम पाटोळे,पप्पु तांबे , संजय पाटोळे , योगेश पाटोळे , दिलीप पाटोळे , भगवान पाटोळे , किशोर पालवे , खंडेराव पाटोळे ,नवनाथ पाटोळे , राहुल पाटोळे , सागर पाटोळे , विक्रम पाटोळे , माणिक पाटोळे , विशाल पाटोळे यांनी सहकार्य केले.
अनुदान देण्याचे ग्वाही
कुस्ती स्पर्धा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न महाराष्ट्राचा असून आता कुस्तीमध्ये ही अनेक विद्यार्थी चमकत आहे यामुळे येत्या काही दिवसात ऑलिंपिक कुस्ती भरण्याचा मानस असल्याचा उदय सांगळे यांनी सांगितले तसेच खेळाडूंसाठी लागणारे सर्व साहित्य मदत लवकरात लवकर अनुदान मार्फत खेळाडूंना देण्यात येईल तसेच सिन्नर च्या खेळाडूंसाठी लवकरात लवकर सिन्नर येथे खेळाडूंसाठी स्पर्धा घेऊन त्यांना अनुदान देण्याचे ग्वाही सह्याद्री युवा मंच संस्थापक व युवा नेते उदय सांगळे यांनी सांगितले