सिन्नर – बारागाव पिंपरी रोड लगत अण्णासाहेब सूर्यभान गडाख यांची शेती असून. यामध्ये गहू ,डाळिंब ,ज्वारी, मका कांदे आदी पिके घेत असतात. नुकतेच दोन दिवसापूर्वी गव्हाचे रान रिकामे झाल्याने. सुदैवाने शेतामध्ये पीक काहीच नव्हते. अशातच गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या नंतर अज्ञात व्यक्तीने किंवा शॉर्ट सर्किटमुळे बारागाव पिंपरी रोड लगत व आसपासच्या डोंगरावर हळूहळू वनवा पेटला. सायंकाळी जोरदार वारे वाहत असल्याने डोंगराचा संपूर्ण परिसर बघता आगीचे रूपांतर मोठ्या वनव्यात झाले. गडाख यांच्या शेतामध्ये ६०० आंब्याच्या झाडाची लागणारी ड्रीप सिंचन ही पूर्णतः जळून खाक झाली. तसेच शेततळ्यासाठी प्लास्टिक कागद हासुद्धा निम्म्याहून जळून गेला. आगीने रौद्र रूप धारण केल्यानंतर आगीचा वनवा सर्वदूर पेटला. अग्नीच्या भक्ष्यस्थानी जनावरांचे कुरण व काही झाडांचे खोड व कलमी आंब्यासाठी तयार केलेले ड्रीप हे आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. ही आग विझवण्यासाठी अण्णासाहेब गडाख,अॅड योगेश गडाख , महेश हांडोरे, अभिषेक गडाख ,बाळासाहेब गायकवाड,रविंद्र मोगल,विकास गिते, यांनी प्रयत्न केले. पण, त्यांना पण यश आले नाही.
आग विझवण्यासाठी रात्रीचा गडद अंधार असल्याने शेतीतील पिकांचा तसेच झाडांच्या बचावासाठी जिकडे जागा मिळेल तिकडे हे सर्व व्यक्ती पळत होते. अशा वेळेस दोघे जण आग विझवण्यासाठी पळत असताना कंपाऊंडच्या तारा मध्ये अडकून खाली पडले असता किरकोळ जखमी झाले. आग विझवण्यासाठी पोते, झाडावरील लिंबाचा पाला, वाळू आदींनी प्रयत्न करूनही आग आटोक्यात येत नव्हती. आगीच्या भक्ष्यस्थानी अनेक काही पिके जाऊ नये म्हणून तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाचे जवान आले. असता आग विझविण्याचा प्रयत्न केला पण डोंगरावर आग लागल्याने व गाडी डोंगरावर चढत नसल्याने त्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आग जर पेटता पेटता सर्वदूर पसरली असती शेजारीच अनेक वस्त्या होत्या त्यांना पण धोका निर्माण झाला असता. पण शर्तीचे प्रयत्न करून गडाख परिवाराने आग आटोक्यात आणली. शेतामध्ये वस्ती असल्याने व त्यामध्ये जनावरे असल्याने मोठी दुर्घटना होता होता राहिली. संबंधित शेततळ्याचे तसेच आंब्याचे झाडांची व पाण्याच्या ड्रिप चे खूपच नुकसान झाले असून एका अज्ञात व्यक्तीच्या किंवा शॉर्टसर्किटमुळे एक ते दोन वर्षाचे तयार झालेले आंब्याची रोपे सुमारे दोनशे ते तीनशे झाडे जळाली. हे खूपच वेदनाशक वाटले त्यामुळे नुकसान झाल्याचे शेती मालक अण्णासाहेब सूर्यभान गडाख यांनी सांगितले.
कडक कारवाई करावी
बारागाव पिंपरी रोड लगत डोंगर व मोकळे मैदान असल्याने तसेच जनावरे चारण्यासाठी कुरण मोठे आहे येथील मैदानावर गवताचे रूपाने अनेक चारा दरवर्षी तयार होतो. पण उन्हाळ्यात हे गवत पूर्णता वाळले जाते. अशा वेळेस येथे बाहेरील व्यक्ती मद्यपान करण्यासाठी येतात व त्याचा त्रास येथील शेतकरीवर्गाला होत असतो. अशावेळेस येथील रस्त्यावर अनेकदा दारूच्या बाटल्या फुटलेल्या असतात. सकाळी अनेक नागरिक येथे फिरण्यासाठी येत असतात. या सर्व गोष्टींचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. नित्यनेमाने योगासने व्यायाम फिरण्यासाठी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण येथील डोंगरावर येत असतात. हे सर्व दृश्य बघून या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा संबंधित विभागाला तक्रार करूनही त्याची दखल कोणी घेतली नाही. तरी लवकरात लवकर संबंधित या गोष्टींवर व खोडसर नागरिकांवर कडक कारवाई करावी असा सूर नागरिकांमधून निघत आहे.
अण्णासाहेब गडाख, सिन्नर