सिन्नर – सर्व जाती धर्मीय वधु वर परीचय मेळाव्याचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र सिन्नर येथे शनिवारी करण्यात आला होता. या मेळाव्याचे आयोजन दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने करण्यात आले होते. उपवर वधु आणि वर यांचे योग्य कुटुंबात विवाह जमावेत आणि त्यांचे भावी आयुष्य सुखा समाधानात जावे म्हणून वर आणि वधू यांची नाव नोंदणी दिंडोरी विवाह संस्कार विभागात केली गेली. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वरचे पीठाधीश प.पू .गुरुमाऊली यांचे सुपुत्र आदरणीय आबासाहेब यांच्या हस्ते दिप प्रज्वलन आणि स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्यास प्रारंभ झाला.
या मेळाव्याच्या यशस्वितेसाठी सिन्नर तालुक्यातील अनेक मान्य वर सेवेकरी यांनी महिनाभर मेहनत घेतली. यामध्ये प्रामुख्याने श्री. शंकर राव खोकले, श्री. रतन हांडोरे, श्री. शांताराम काका उगले, श्री . रामनाथ म्हस्केसर, सौ. मुरकुटे ताई, सौ. सोनवणे ताई , सौ. डोंगरे ताई तसेच नवीन सेवेकरी श्री. सुरज साठे यांचा समावेश होता. सिन्नर केंद्रातील सेवेकरी श्री. ज्ञानेश्वर कोकाटे, श्री. श्रीकांत (बापू ) काळे, श्री. राजेंद्र क्षत्रिय, श्री. सुनिल वराडे, श्री. प्रविण झगडे, श्री. संजय पाचोरे श्री. जे.टी. गुंजाळ, श्री.उपेंद्र गोळेसर, श्री. सचिन गुंजाळ, सौ. आणि श्री . शेलार तसेच अनेक ज्ञात अज्ञात सेवेकरी बंधु भगिनी यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य मिळाले.
या वधु वर परीचय मेळाव्याच्या प्रसंगी सूत्रसंचलन श्री. केशवराव घोडे जिल्हा प्रतिनधी यांनी केले. कार्यक्रमाचा हेतू तसेच व्याप्ती जिल्हा विभाग सेवेकरी श्री. राजकुमार ढिसले आणि सौ. नागरे मेघा यांनी विशद केली. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक श्री. ज्ञानेश्वर कोकाटे यांनी केले .
या मेळाव्या प्रसंगी आदरणीय आबासाहेब यांनी सेवा मार्गाचे विविध उपक्रम आणि श्रीमद भगवत गीता यांमधील आठरा अध्याय यांचा संबंध विशद केला . सेवा केंद्रातील १८ विभाग आणि त्यातील बालसंस्कार विवाह संस्कार आणि कृषी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कमीतकमी खर्चात विवाह संपन्न व्हावेत . अनाठायी खर्च करू नये हुंडा आणि मानपान यास फाटा देऊन लग्न समारंभ करावेत. सोने नाणे यास फार महत्व देऊ नये असे आवाहन त्यांनी केले. विषमुक्त शेती तसेच स्वयं रोजगार या बाबत अमूल्य मार्गदर्शन केले. केवळ जन्मकुडली न बघता सात्विक कुटुंब आणि सुसंस्कारीत मुलं मुली याना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले .शेती व्यवसाय शाश्वत असून केवळ नोकरी करणाऱ्या स्थळांचा मोह टाळावा असेही त्यांनी सागितले .
सिन्नर केद्रातील सेवेकरी श्री. कैलास झगडे यांनी आज जे विवाह जमतील त्याना सामुदायिक विवाह लावणेसाठी श्री स्वामी समर्थ लॉन्स भाटवाडी हे कार्यालय मोफत उपलब्ध करून दिले जाईल असे जाहिर केले आहे. या सहकार्याबद्दल आदरणीय आबासाहेब यांनी त्यांना आशिर्वाद रुपी प्रसाद दिला. मेळाव्यासाठी प्रत्येक जाती धर्मानुसार नावनोंदणी टेबल लावण्यात आले होते. आज नाव नोदणी साठी संपूर्ण नाशिक जिल्हा तसेच नगर जिल्हा येथून भाविक मुलेमुली आले होते. दुपारी ३ वाजे पर्यंत सहाशे पन्नास मुला मुलीनी फॉर्म भरले. समुपदेशन करण्यासाठी टेबल मांडले होते. कार्यक्रमासाठी आलेले पालक व विवाह इच्छुक वर आणि वधु तसेच सर्व भाविक सेवेकरी यांचे तालुका प्रतिनीधी श्री. संजय पाचोरे यांनी आभार मानले.