सिन्नर – इंडियाबुल्स कोविड केअर सेंटर येथून बुधवारी घोटेवाडी येथील दोन वर्षीय सानवी श्रीकांत घेगडमल या चिमुरडीला सात दिवसाच्या उपचारानंतर डिस्जार्च देण्यात आला. दोन वर्षाच्या चिमुरडीने कोरोनासारख्या आजारावर मात केल्यामुळे सर्वच भावूक झाले होते. त्यामुळे डिस्जार्च देतांना हॅास्पिटचे सर्व डॅाक्टर व कर्मचारी उपस्थितीत होते. या सात दिवसात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव व डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व टीम इंडिया बुल्सच्या कर्मचा-यांनी औषध उपचार केले. डिस्जार्च देतांना सानवी व तिच्या आई वडिलांनी समाधान करत कोविड केअर सेंटरमधील सर्व डॅाक्टर, कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!