विकास गिते, सिन्नर
गेल्या उन्हाची तीव्रता वाढली असून याचा परिणाम अनेक गोष्टींवर दिसून येत आहे. या कडक उन्हामुळे अकरा वाजेच्या पुढे रस्ते ओस पडलेले दिसत आहे. ही उन्हाळ्यात पूर्वीचीच चाहूल सगळीकडे दिसत आहे. तसेच मार्च महिन्याच्या मध्यातच उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला आणखी उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहे. नाशिक लगत असलेल्या मालेगावने यापूर्वीच ४० अंशाचा टप्पा ओलांडला असल्याने मालेगावकरांना देखील वाढत्या कमाल तपमानाचा फटका बसु लागला आहे. उन्हाची तीव्रता वाढत चालली असताना याचा परिणाम सगळ्याच मनुष्य प्राण्यांसह मुक्या प्राण्यांना सुद्धा या उन्हाच्या तीव्र त्याची झळ सोसावी लागत आहे. मुक्या जनावरांना उन्हाचा सामना करावा लागत आहे.
सकाळी साडे आठवाजेपासूनच उन्हाची तीव्रता हळूहळू वाढते. सिन्नर तालुक्यात व शहरात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता अशीच आहे. त्यातच भर दुपारच्या प्रहारमध्ये मुक्या जनावराला पाणी प्यायची आस लागल्याने एका माणसाने या मुक्या प्राण्याची पाणी देऊन तुष्णा भागवली. भूतदया करणे हे माणसाचे प्राथमिक काम मानले जाते. उन्हाळ्याचे दिवस आत्ताच पुढे सुरू असून सुद्धा आपल्या घराच्या गच्चीवर किंवा झाडावर पशुपक्ष्यांसाठी पाण्याची सोय करावी असे आवाहन प्राणी व पक्षी मित्र मधून सतत निघत असते. हे काम करताना सुद्धा शाळकरी मुले तसेच गृहिणीसुद्धा पक्षांसाठी पाणी तसेच अन्य धान्याच्या वाटी घराच्या बाहेर ठेवत असतात त्यामुळेच पशु पक्षांना पाणी व अन्नासाठी दूरवर भटकंती करावी लागत नाही.