सिन्नर – सिन्नर विधानसभा मतदारसंघातील वाहतूक व्यवस्था सुलभ होण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रस्ते कामांच्या मंजुरीसाठी पाठपुरावा केला होता.त्यामुळे पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुमारे ४३ कोटी ४२ लक्ष रुपये निधीचे रस्ते व पूल ,त्याचप्रमाणे ८ कोटी ८९ लाख रुपये शाळा बांधकाम असा एकूण सिन्नर विधानसभा मतदारसंघात ५२ कोटी ३१ लाख रुपये निधी मंजूर केला आहे.
सिन्नर विधानसभा मतदार संघातील अनेक रस्त्यांचे मजबुतीकरण व दुरुस्ती करण्याची मागणी गेल्या पाच-सहा वर्षांपासून करण्यात येत होती.गेल्या दोन-अडीच वर्षांत कोविडमुळे शासनाच्या तिजोरीवर ताण आलेला असतांनाही आमदार माणिकराव कोकाटे यांनी बऱ्याच रस्त्यांना मंजुऱ्या मिळवून आणल्या.तथापि, कोविडचा ओसरलेला जोर व शासनाच्या तिजोरीत होत असलेली वाढ विचारांत घेऊन आमदार माणिकराव कोकाटे यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मतदार संघातील जास्तीत जास्त रस्त्यांना निधी मंजूर होण्यासाठी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव दाखल केले होते.त्यानुसार पवार यांनी सार्वजनिक बांधकाम व आदिवासी विकास विभागांतर्गत रस्ते व पूल यांच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर केला.
मंजूर झालेल्या कामांची नावे व कंसात निधी-
सिन्नर तालुक्यातील रस्त्यांसाठी १८ कोटी ४४ लाख मंजूर झाले आहेत. ओझर सायखेडा वडांगळी वावी किमी ४४.६०० ते ४६.५०० व ५१.३०० ते ५३.२०० ची सुधारणा करणे (१ कोटी ५२ लाख),गोंदे दापूर चापडगाव राज्य मार्ग ३२ किमी ६ ते ९(१ कोटी २० लाख),राष्ट्रीय मार्ग ५० पासून गोंदे दापूर चापडगाव राज्य मार्ग ३२ किमी १५ ते १८(१ कोटी २० लाख),प्रजिमा २ धारणगाव सारोळेथडी सोमठाणे पंचाळे पांगरी दोडी दापूर ठाणगाव रस्ता प्रजिमा किमी १७ ते २४(२ कोटी ३७ लाख),सिन्नर जायगाव नायगाव रस्ता प्रजिमा २८ किमी ० ते ०.३००,२.५०० ते ४.८००,१०.५०० ते १३.८०० (१कोटी ८० लाख),नांदूरशिंगोटे मऱ्हळ वावी रस्ता प्रजिमा ३३ किमी १.५०० ते ९.५००(२कोटी६६ लाख),प्ररामा सिन्नर डुबेरे पाडळी समशेरपूर रस्ता प्रजिमा ३० किमी ८ ते १७(२कोटी६६ लाख),वडांगळी खोपडी प्ररामा १२ रस्ता प्रजिमा ३२ किमी ११ ते१२.१००(२कोटी६६ लाख),प्ररामा धारणगाव सारोळेथडी सोमठाणे पंचाळे दोडी ठाणगाव प्रजिमा२५ किमी १७.१०० ते २४(२कोटी ३७ लाख)
टाकेद साठी २गटातील रस्त्यां५ कोटी रुपये…
धामणगाव ते सर्वतीर्थ टाकेद रस्ता किमी ० ते ४ काँक्रीटीकरण (६ कोटी ७० लाख),प्ररामा १२ धामणी ते बोराची वाडी ग्रामा ०१ रस्ता ० ते २.५० किमी,(७१ लाख),भरवीर बु ते निनावी पिंपळगाव डुकरा ते प्ररामा किमी ० ते ८.५० मजबुतीकरण व डांबरीकरण,(२ कोटी ५६ लाख ),एसटीबीटी ते प्रजिमा २४ म्हैसवळण घाट ते आघानवस्ती किमी ० ते १ खडीकरण (४७ लाख),धामणगाव ते घोटी खु ग्रामा ५८ रस्ता किमी ० ते २ खडीकरण व डांबरीकरण (४७ लाख),भगूर वहाळ ते जुना भगूर धामणगाव रस्ता ग्रामा ५८ किमी ० ते २ स्लॅब ड्रेनेज (२९ लाख),जुना बस थांबा ते ग्रामा ८० बेलगाव नदीघाट रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे (३८ लाख),प्ररामा १२ कांचनगाव काळूस्ते ते नेरपन मांजरगाव आंबेवाडी अहमदनगर जिल्हा हद्द प्रजिमा २३ किमी ११ ते १३.५०० रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण व १२.५०० मध्ये स्लॅब ड्रेनेज बांधणे(७६ लाख),आधारवड ते टाकेद बु ते म्हैसवळण घाट प्रजिमा २४ ते आघानवस्ती किमी ८.५०० ते १०.५०० खडीकरण व डांबरीकरण करणे (८५ लाख),प्ररामा २ ते धारणगाव पंचाळे ठाणगाव भरवीर अडसरे वासाळी इंदोरे आंबेवाडी भावली रस्ता७८.५०० ते ८२ ,८५ ते ८८ व ९० ते ९२ (२ कोटी ५६ लाख)
आदिवासी विकासंतर्गतची कामे
इंदोरे गावठाण ते कळसुबाई मंदिर रस्ता डांबरीकरण
किमी ० ते १.८००(५० लाख),इंदोरे गावठाण ते कळसुबाई मंदिर रस्ता व संरक्षण भिंत,(२० लाख),राज्यमार्ग २३ ते भरवीर गांगडवाडी खेड रस्ता (९० लाख),आधारवड ते परदेशवाडी स्लॅबड्रेनेज व नवीन रस्ता (७० लाख),भंडारदरावाडी ते मदगेवस्ती किमी रस्ता स्लॅबड्रेनेज सह (७० लाख),धामणगाव ते घोटी खु रस्ता (९५ लाख),आधारवड ते टाकेद बु म्हैसवळण घाट रस्ता किमी ५.८०० ,मधील पुलासह संरक्षण भिंत बांधणे(१ कोटी ९५ लाख),खडकेद माळवाडी पडवळवाडी काननवाडी रस्ता पुलासह संरक्षण भिंत बांधणे(९५ लाख),बांबळेवाडी ते धानोशी रस्ता ग्रामा ७१ चे ० ते १.५०० पुलाचे बांधकाम करणे(९५ लाख),इंदोरे ते खेड रस्ता किमी १ वर पुलाचे काम करणे (९५ लाख)
धोंडबार येथे होणार अत्याधुनिक आश्रमशाळा..
आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी चांगल्या भौतिक सुविधा व अत्याधुनिक इमारत असणे गरजेचे असल्याने सिन्नर तालुक्यातील धोंडबार येथील आदिवासी आश्रम शाळेसाठी अत्याधुनिक इमारती बांधण्यासाठी निधीची मागणी आमदार कोकाटे यांनी केली होती.त्यानुसार
८ कोटी ८९ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
दळणवळण सुलभ होणार…
सिन्नर विधानसभा मतदार संघातील अनेक रस्ते व पूल यांच्यासाठी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याकडे अर्थसंकल्पात तरतूद करण्याची विनंती केली होती.त्यानुसार ५० कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर झाला आहे.शिवाय मागील मंजूर कामांनाही निधी वितरण होणार आहे.त्यामुळे सिन्नर तालुक्यातील दळणवळण सुलभ होणार आहे.
अॅड. माणिकराव कोकाटे, आमदार सिन्नर