सिन्नर – शहरासह तालुक्यात अनेक भागात अवकाळी पावसाने शुक्रवारी पाच वाजेनंतर आगमन झाले. पाऊस ,विजेच्या कडकडाटा, वादळी वारा जोरदार असल्याने सिन्नर शहरास तालुक्यातील अनेक गावात विज प्रवाह खंडित झाला. या पावसामुळे शेतकरी राजा व नागरिक हवालदिल झाले. या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, मका, कांदे आदी पिकांचे मोठे नुकसान झाले.
सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील पूर्व भागातील फरदापुर खोपडी व नायगावसह पाच ते सहा गावांना अवकाळी पावसाचा फटका बसल्या नंतर शुक्रवारी सकाळी कृषी अधिकारी, तलाठी आदी अधिकारी वर्ग शेतकरीवर्ग यांच्या बांधावर जात पिक नुकसानीचे पाहणी केली. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या नंतर सिन्नर शहरासह तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली अचानक आलेल्या पावसाने व विजेच्या कडकडाटासह अनेक गावांमध्ये पावसाने हाहाकार केला. या अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे. शुक्रवारी पाच वाजेच्या नंतर पाऊस बरसला. काढणीला आलेला, गहू कांदा हरभरा शेतात काढून पडलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सिन्नर शहरातील सिन्नर शिर्डी रोड वरील मुक्तेश्वर नगर समोर रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक थोड्यावेळ विस्कळीत झाली होती. सतत रस्त्यावर पाणी साचत असल्याने स्थानिक नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. समस्याचे स्थानिक विभागाने मार्ग काढावा अशी विनंती नागरिकांकडून होत आहे.
तसेच परिसरात कांद्याचे व गहू हरभऱ्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. तसेच गव्हाचे व कांद्याचे आगर म्हणून हा भाग प्रसिद्ध आहे. सध्या परिसरात बहुतांश गहू व कांदा काढणीला आलेला आहे. तर काही शेतकन्यांनी कांदा काढल्यानंतर तो शेतातच उघड्यावर पडून आहे. त्यामुळे अवकाळी पावसात कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गव्हाबरोबरच काही प्रमाणात लागवड करण्यात आलेल्या टोमॅटो पिकाचेदेखील नुकसान झाले आहे. दोन वेळा व आता तिसऱ्यांदा अवकाळी झालेल्या पावसाने पिकांमध्ये पाणी साचले होते. परिणामी पिकांची सडघाण झाली असून अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे अतोनात नुकसान झालेले दिसून येते हाती आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे ही राहून गेल्याचे शेतकरी वर्ग मधून सूर निघत आहे.