सिन्नर- तालुक्यातील पूर्व भागातील फरदापुर या गावात गुरुवारी दुपारी अचानक आलेल्या पावसाने उभ्या पिकातील शेताचे अतोनात नुकसान केले असून शेतातील गहू हरभरा मका कांदा आदी पिकात पावसाचे पाणी साचल्याने तसेच विजेच्या कडकडाटासह जोराचा वारा असल्याने गहू व हरभरा तसेच मका पिकाचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र फरदापुर या गावात दिसून आले
सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगावसह पाच ते सहा गावांना अवकाळी पावसाचा फटका बसल्या नंतर आज दुपारनंतर सिन्नर शहरासह पूर्व भागातील फरदापुर खोपडी आदी भागात अवकाळी पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली अचानक आलेल्या पावसाने व विजेच्या कडकडाटासह अनेक गावांमध्ये पावसाने हाहाकार केला या अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे मंगळवारी (दि. ८) रात्री गारपीट झाल्यानंतर गुरुवारी दुपारी चार वाजेच्या नंतर पाऊस बरसला. काढणीला आलेला, गहू कांदा हरभरा शेतात काढून पडलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे..
परिसरात कांद्याचे व गहू हरभऱ्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. तसेच गव्हाचे व कांद्याचे आगर म्हणून हा भाग प्रसिद्ध आहे. सध्या परिसरात बहुतांश गहू व कांदा काढणीला आलेला आहे. तर काही शेतकन्यांनी कांदा काढल्यानंतर तो शेतातच उघड्यावर पडून आहे. त्यामुळे अवकाळी पावसात कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गव्हाबरोबरच काही प्रमाणात लागवड करण्यात आलेल्या टोमॅटो पिकाचेदेखील नुकसान झाले आहे. दोन वेळा व आता तिसऱ्यांदा अवकाळी झालेल्या पावसाने पिकांमध्ये पाणी साचले होते. परिणामी पिकांची सडघाण झाली असून अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे अतोनात नुकसान झालेले दिसून येते हाती आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे ही राहून गेल्याचे शेतकरी वर्ग मधून सूर निघत आहे
कांद्याचे तसेच गव्हाचे नुकसान झाले आहे. काँबात पाणी शिरल्याने आता शेतकऱ्यांना कापणीसाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तिकडे शिवडे परिसरात कांदा, गहू, द्राक्षशेतीला फटका बसला आहे. जनावरांचा चारा देखील भिजून नुकसान झाल्याने चाराटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. बियाणासाठी धरलेल्या डोंगळ्यांच्या प्लॉटलादेखील फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.