सिन्नर : धुमधडाक्यात साजरे होणाऱ्या वाढदिवसाला फाटा देत आपलही समाजाप्रती काहीतरी देणं लागतं या भावनेतून शहरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच यु.आर.के ट्रेडर्सचे संचालक उदय गोळेसर यांच्याकडून आपल्या वाढदिवसानिमित्त सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात रविवारी कोरोना प्रतिबंधक साहित्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे.
सिन्नर तालुक्यात कोरोनामुळे अनेकांचे कुटुंब उदध्वस्त झाले असून रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे काही दिवसांत बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सिन्नर शहरातील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते उदय गोळेसर यांनी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक पंकज मोरे, रुपेश मुठे तसेच कार्यकर्त्यांसोबत आपल्या वाढदिवसानिमित्त सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेऊन रुग्णांशी संवाद साधला तसेच त्यांच्या समस्या जाणून घेत रुग्णालयाला विविध कोरोना प्रतिबंधक साहित्य भेट देऊन रुग्णांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. या साहित्यांमध्ये १०० एन ९५ मास्क, २०० हँडग्लोज, १० वेफोरायझर मशीन, पल्स ऑक्सिमिटर व सॅनिटायझरच्या कॅन ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. वर्षा लहाडे यांच्याकडे सुपूर्द केल्या.
तसेच यावेळी त्यांनी नागरिकांनीही कोरोनाला आळा घालण्यासाठी सहकार्य करून कोरोनाविषयक सर्व आवश्यक नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे त्यांनी कोरोनावर मात करण्यासाठी खारीचा वाटा उचलून इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे. सिन्नर ग्रामीण रुग्णालयात याप्रसंगी नगरसेवक पंकज मोरे, नगरसेवक रुपेश मुठे, विशाल लोंढे, सचिन मिठे, विजय वारुंगसे, विनोबा गोळेसर, दिनेश भाटजिरे, राहुल लोणारे, हरीश पाटील, योगेश शिरोळे, राहुल आहिरे, राकेश भाटजिरे, स्वप्नील पाळेकर, अजय गवळी आदी उपस्थित होते.