सिन्नर – शहरात व तालुक्यात सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान विजेच्या कडकडाटसह अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची धावपळ उडाली सतत वातावरणातल्या बदलामुळे व हवामानाच्या बदल्यामुळे आज अचानक सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान पावसाने हजेरी लावल्याने सिन्नर शहरातील नागरिकांची धावपळ उडाली. मोह, वडझरे, जायगाव गावात गाराही पडल्या. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावर बसणारे भाजीपाला वाले तसेच बाहेर निघालेले नागरिक यांची चांगलीच धावपळ झाली. त्यांनी अनेक दुकानांचा आसरा घ्यावा लागला. तसेच शेतकरीही अचानक आलेल्या पावसाने हवालदिल झालेले दिसून आले. शेतकरी वर्गावर अचानक आलेल्या पावसाने पिकांवर काही संकट येते का या काळजीत शेतकरी दिसून आले. या अवकाळी पावसामुळे कांदा व गव्हाच्या पिकांना नुकसान झाले आहे.