सिन्नर – तालुक्यातील ९ गावांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून अनुसूचित जाती वस्तीतील विकास कामांसाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांतून १ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. यातून मुख्यत्वे प्रशस्त अशा बुद्ध विहारांची बांधकामे व सुशोभीकरण होणार आहे. सिन्नर तालुक्यातील अनुसूचित जातींच्या वस्त्यांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण विकास कामे करण्याची मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे संबंधित गावांतील ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागातून अनुसूचित जाती वस्तीतील ही कामे मंजूर होण्यासाठी या विभागाचे मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्याकडे आमदार कोकाटे यांनी मागणी केली होती.राज्यशासनाने नुकतेच या कामांच्या प्रशासकीय मंजुरीचे आदेश दिले.कामे मंजूर झाल्याने संबंधित गावातील सरपंच,ग्रामपंचायतचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
६ गावांत आकर्षक बुद्ध विहार….
अनुसूचित जाती वस्तीत गटार, रस्ते ही पारंपरिक कामे वारंवार करण्यापेक्षा वैशिष्ट्यपूर्ण कामे अशा वस्त्यांमध्ये करण्यासाठी आमदार कोकाटे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून मतदार संघात सलग दुसऱ्यांदा एकाचवेळी ६ गावांमध्ये बुद्ध विहारांची कामे होत आहे.बुद्धविहार बांधकाम व अनुषंगिक कामे करण्यासाठी तालुक्यातील हिवरे,पांढुर्ली,खंबाळे, घोटेवाडी,मऱ्हळ येथे प्रत्येकी १० लाख तर टाकेद येथे २० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.याव्यतिरिक्त पंचाळे,नायगाव व चास येथे सामाजिक सभागृहे व अनुषंगिक कामांसाठी प्रत्येकी १० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.१ कोटी रुपये निधीची ह्या सर्व कामांना लवकरच सुरुवात होणार आहे.
दलित वस्तीत वैशिष्ट्यपूर्ण कामे….
मागील वर्षी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून सिन्नर विधानसभा मतदारसंघात ६ गावांत बौद्धविहारांच्या कामास मंजुरी मिळाली होती.यावर्षीही नव्याने ६ गावांत अशीच कामे होत आहे.आमदार कोकाटे यांच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण कामे होत असल्याने संबंधित भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न…
समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहचला पाहिजे अशीच आपली भूमिका राहिली असून कोरोनामुळे शासनाने विकास कामांवर मर्यादा आणल्या होत्या.आताही शासनाच्या आर्थिक परिस्थितीवर मर्यादा येत असल्या तरी त्यावर मार्ग काढत आपण विकास कामे मंजूर करून आणत आहोत.यापुढील काळात उर्वरित गावांनाही त्यांच्या गरजांनुसार निधी मंजूर करून आणला जाईल.
आमदार माणिकराव कोकाटे