सिन्नर – पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी किशोर पाटोळे याने इ.९ वी त असतांना प्रथमच शालेय जीवनात आपली खेळातील आवड व जिद्द यावर मात करत रनिंगमध्ये तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकवला. यांनतर त्याने महाविद्यालय जीवनात विभागस्तर,राज्यस्तर व नुकतीच दिल्लीत झालेल्या स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशन महाराष्ट्र या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत त्याने बाजी मारून प्रथम क्रमांक पटकवला. धावण्याच्या स्पर्धेत उत्तम कामगिरी करून त्याला सैन्य दलात जाऊन देशसेवा करण्याची आवड आहे. या त्याच्या कामगिरीसाठी त्याला प्रशिक्षणाची व प्रशिक्षकाची त्यासोबत आर्थिक पाठबळ आवश्यक आहे.या यशाबद्दल विद्यालयाने त्याचा येथोचित सत्कार केला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी शरीराने काटक कष्टाळू,व मेहनती असतात त्यात विद्यालयाकडून त्यांना योग्य मार्गदर्शन व सातत्याने सराव यातून सर्व विद्यार्थी आकाशाला गवसणी घालतात म्हणूनच किशोर पाटोळे सारखे विद्यालयातील आज पर्यंत २१ विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपल्या कामगिरीची चुणूक दाखवून खेळामध्ये यशस्वी झालेले आहेत. त्यांच्या या आवडीतून विद्यालयाचे अनेक विद्यार्थी खेळाबरोबर भारतीय सैन्य दलात व विविध कार्यक्षेत्रात आज काम करत आहे ही विद्यालयाची भूषणावह बाब आहे. मात्र विद्यार्थ्यांनी यात सातत्य ठेवून विद्यालयाचे नाव उंच शिखरावर पोहचवावे असे सांगितले. किशोर पाटोळे या यशस्वी खेळाडूचे कौतुक बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव प्रा.टी.एस.ढोली,विश्वस्त अरुण गरगटे यांनी करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आशापुर येथील ऋषिकेश भारत पाटोळे व विद्यालयातील शिक्षक बी.आर. चव्हाण,आर.व्ही.निकम,एस.एम.कोटकर,आर. टी.गिरी,एम.सी.शिंगोटे,श्रीमती एम.एम.शेख,सौ सविता देशमुख,टी.के.रेवगडे,श्रीमती सी.बी.शिंदे,के.डी.गांगुर्डे,एस. डी.पाटोळे, आर.एस.ढोली,ए.बी.थोरे हे उपस्थित होते.