सिन्नर – पाडळी येथे आगीत संसार उदध्वस्त झालेल्या कुटुंबाला जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांनी संसारपयोगी भांड्यांची मदत केली. पाडळी येथील संजय राधाकिसन वारघडे यांच्या घराला आग लागून कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. कोकाटे यांनी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. आगीत वारघडे यांचे सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने त्यांना अन्न शिजवण्यासाठी भांड्यांची गरज ओळखून कोकाटे यांनी कुटुंबाला भाडे देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार नुकतेच प्रवीण कोकाटे व माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले यांनी सदर भांडी वारघडे यांच्याकडे सुपुर्द केली. तुकाराम मेंगाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी कपडे धान्य व किराणा वस्तू देऊन सहकार्य केले. कोकाटे यांनी गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वारघडे कुटुंबियांना घरकुल मिळण्यासाठी त्यांचे नाव शबरी आवास योजनेमध्ये समाविष्ट करण्याच्या सुचना केल्या. यावेळी तुकाराम मेंगाळ, राजेंद्र पथवे, अजय कडाळे, प्रल्हाद उघडे, बबन मेंगाळ, एकनाथ पथवे, तान्हाजी मेंगाळ, कचरू मेंगाळ, अर्जुन जाधव, पांडूरंग मेंगाळ, सोमा मेंगाळ, योगेश अगिवले, सोमनाथ मेंगाळ, राजेंद्र मेंगाळ, राजेंद्र पथवे, कैलास गिरे, अमोल पथवे, रोहिदास मेंगाळ उपस्थित होते.