सिन्नर – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी बारागांव पिंप्री येथील सौ. सविता सोपान उगले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसभापती संजय खैरनार यांनी आवर्तन पध्दतीने राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार २८/०२/२०२२ रोजी आयोजित विशेष बैठकीत उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली. सौ. सविता सोपान उगले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत उपसभापती पदासाठी एकच अर्ज दाखल झाला. सौ. सविता सोपान उगले यांच्या अर्जावर सुचक म्हणून सो. सुनिता भारत बोऱ्हाडे तर अनुमोदक म्हणून सोमनाथ मुरलीधर भिसे यांनी स्वाक्षरी केली.
बैठकीस सभापती विनायक घुमरे, संचालक संजय खैरनार, सुधाकर शिंदे, विनायक तांबे, शांताराम कोकाटे, सोमनाथ भिसे, दत्तात्रय शेळके, सुनिल घुमरे, सुनिता बो-हाड़े, पंढरीनाथ खैरनार, लता रुपवते इ. उपस्थित होते. उपस्थितांचे आभार सोमनाथ भिसे यांनी मांडले. निवडणूक निर्णय अधिकारी यांना बाजार समितीचे वतीने सचिव विजय विखे व उपसचिव राजेंद्र जाधव यांनी सहाय्य केले.