सिन्नर – सिन्नर विधानसभा मतदारसंघात २४ गावांतील स्मशानभूमी व दशक्रिया विधी परिसरात इहलोकच्या यात्रेस निघालेल्या व्यक्तीस निरोप देण्यास आलेल्या आप्तस्वकीयांना आणखी चांगल्या सुविधा मिळाव्या म्हणून त्या ठिकाणी मूलभूत कामे करण्यासाठी व गावांत ग्रामपंचायत कार्यालये बांधण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांतून सुमारे २ कोटी ६५ लाख रुपयांची कामे जनसुविधा योजनेंतर्गत मंजूर झाली आहे.
गेल्या ६ वर्षांपासून जनसुविधेअंतर्गत ग्रामीण भागातील स्मशानभूमी व दशक्रिया विधी परिसरात विकास कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळू लागला आहे.सिन्नर विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागात या कामांची मोठ्या प्रमाणावर मागणी आसल्याने आमदार माणिकराव कोकाटे यांनी पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्याकडे कामांची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा वार्षिक योजनेच्या जनसुविधेअंतर्गत जिल्हाधिकारी यांनी नुकतीच दशक्रिया विधी शेड व आनुषंगिक कामे, स्मशानभूमी बांधकाम, स्मशानभूमिकडे जाणारा रस्ता व ग्रामपंचायत कार्यालय बांधणे या कामांना दिली. यामुळे संबंधित गावांतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
११ गावांत १ कोटी १७ लाखातून दशक्रिया विधी परिसर बदलणार..
सिन्नर तालुक्यात ११ गावांना १ कोटी १० लाख रुपये निधी दशक्रिया विधी शेड व आनुषंगिक कामांसाठी मंजूर झालेले आहे. त्यातून या गावांत सुविधा निर्माण होतील. गावाचे नाव व गावनिहाय मिळालेला निधी पुढीलप्रमाणे- कीर्तागळी –१० लाख ,फर्दापूर -१० लाख ,वडगाव पिंगळा- १० लाख ,शहा – १० लाख ,मऱ्हळ – १० लाख ,वडांगळी – ७.५ लाख ,वावी- १० लाख,घोटेवाडी – ७.५ लाख ,दहिवाडी – ७.५ लाख ,आगासखिंड – १० लाख ,कोमलवाडी – ७.५ लाख , धनगरवाडी – १० लाख व निमगाव देवपूर – ७.५ लाख
स्मशानभूमी शेड व आनुषंगिक कामांसाठी ५७ लाख रुपये..
स्मशानभूमी शेड,आनुषंगिक कामे व पोहोच रस्ता यासाठी ५७ लाख ५० हजार रुपये सिन्नर तालुक्यासाठी मंजूर झाले असून काम मंजूर झालेले गांव व रक्कम पुढीलप्रमाणे सोनगिरी –१५ लाख ,पांगरी खु –७.५ लाख,मीठसागरे – ७.५लाख ,शिवडे- १० लाख,पंचाळे – १० व ७.५ लाख रुपये
ग्रामपंचायतीना मिळणार हक्काच्या च्या इमारती
बोरखिंड,पंचाळे व पांढूर्ली या ग्रामपंचायतीना आता हक्काच्या नव्या इमारती मिळणार असून त्यासाठी प्रत्येकी १५ लाख असा एकूण ४५ लाख रुपये निधी सिन्नर तालुक्यात तर टाकेद गटातील पिंपळगाव घाडगा या ग्रामपंचायतीलाही १५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
टाकेद गटात ४५ लाख रुपयांची कामे..
टाकेद गटातही स्मशानभूमी बांधकाम व दशक्रिया विधी शेड साठी निधी मंजूर झाला आहे. स्मशानभूमी बांधकामासाठी माळवाडी (खेड )- ५ लाख व ७.५ लाख,अडसरे बू – ५ लाख, सोनोशी –५ लाख व बारशिंगवे स्मशानभूमी घाट –५ लाख त्याचप्रमाणे दशक्रिया विधी शेड व आनुषंगिक कामासाठी शेणीत – १० लाख ,भोईरवाडी – ७.५ लाख असा एकूण ४५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
शक्य तेवढी विकास कामे मंजूर करून आणली
मागील दोन वर्षे कोरोनामुळे आर्थिक निर्बंध असतांनाही शक्य तेवढी विकास कामे मंजूर करून आणली.आता शासनाची आर्थिक परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे.आता चांगल्या प्रमाणावर निधी मंजूर करून आणण्यात यश मिळाले असून यापुढील काळात प्रत्येक गावांत टप्प्याटप्प्याने मूलभूत विकास कामांसाठी निधी मंजूर करून आणला जाईल.
माणिकराव कोकाटे, आमदार