आमदार माणिकराव कोकाटे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना केली होती सुचना
सिन्नर – भोजापूर धरणात शिल्लक असलेल्या १२० दशलक्ष घनफूट पाण्यातून पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ आवर्तन सोडण्याची सुचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना केली होती.त्यामुळे सोमवार (३ मे) पासून धरणातून आवर्तन सोडण्यात येणार आहे.
मागील पावसाळ्यात भोजापूर धरण पुरेशा क्षमतेने भरले होते.रब्बी हंगामासाठी १० फेब्रुवारी रोजी आवर्तन सोडण्यात आले होते.मात्र पावसाच्या पाण्याने विहिरींची पातळी उंचावलेली असल्याने शेतकऱ्यांकडून सिंचनासाठी पाण्याची पुरेशी मागणी झाली नाही.त्यामुळे या धरणात १२० दशलक्षघनफूट पाणी शिल्लक आहे.शिल्लक पाण्यातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाणीपुरवठा योजनांना आवश्यक असलेले पाणी धरणात शिल्लक ठेवून उर्वरित पाण्यातून उन्हाळ आवर्तन सोडावे व त्यातून कालव्यालगत असलेले पाझर तलाव,बंधारे भरून द्यावे,अशा सूचना आमदार कोकाटे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल..
भोजापूर धरणात असलेल्या १२० दशलक्षघनफूट पाण्यातून मनेगावसह १६ गावे व कणकोरीसह ५ गावांना जुलैअखेर पुरेल इतके सुमारे ३२ दशलक्षघनफूट व ४५ ते ५० दशलक्ष घनफूट पाण्याचे बाष्पीभवन व गळती गृहीत धरून सुमारे ७५ ते ८० दशलक्ष घनफूट पाणी भोजापूर धरणात ठेवण्यात येणार आहे. उर्वरीत सुमारे ४० दशलक्ष घनफूट पाण्यातून पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ आवर्तन सोडण्याची सुचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना केली होती.त्यामुळे सोमवार (३ मे) पासून धरणातून आवर्तन सोडण्यात येणार आहे.
असा आहे पाण्याचा हिशेब
– १२० दशलक्षघनफूट धरणात आजचा पाणीसाठा
– ३२ दशलक्षघनफूट पाणी दोन पाणीपुरवठा योजनांसाठी
– ४५ ते ५० दशलक्षघनफूट पाण्याचे बाष्पीभवन व गळती होणार
– ४० दशलक्षघनफूट पाणी कालव्यालगत असणाऱ्या बंधारे व पाझर तलावांना मिळणार
…….
१० ते १२ दिवस आवर्तन चालेल..
भोजापूर धरणातून पिण्याचे पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले असून ३ मे रोजी सुरू झालेले आवर्तन १० ते १२ दिवस चालेल.पाणी योजनांबरोबरच जनावरांसाठीही पाझरतलाव व बंधारे भरून देण्यात येणार आहे.
बी.के.अचाट, शाखा अभियंता
……….
पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे…
भोजापूर धरणात मनेगावसह १६ गावे व कणकोरीसह ५ गावे पाणीपुरवठा योजनांना पाणी ठेवण्याबरोबरच उर्वरित पाण्यातून शक्य तेवढे पाझरतलाव, बंधारे भरून देण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.जनावरांच्याही पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे,ही आपली भूमिका असून त्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत. सोमवार ३ मे पासून आवर्तन सोडण्यात येणार आहे.
माणिकराव कोकाटे,आमदार सिन्नर