नाशिक : सिन्नर फाटा भागातील खर्जुल मळा येथे पेटता दिवा अंगावर पडल्याने मंदिरात ध्यानात बसलेल्या २२ वर्षीय शिवभक्त भाजल्याची घटना घडली आहे. सागर संपत खाटीकमारे (रा.खर्जुळ मळा ) असे गंभीर भाजलेल्या तरूणाचे नाव आहे. या घटनेत सागर हा तरूण ९५ टक्के भाजला असून त्याची प्रकृर्ती गंभीर आहे. महादेवाच्या पिंडेसमोर बसून तो धारणा करीत असतांना अचानक जवळच भिंतीवर ठेवलेला पेटता दिवा पडल्याने ही दुर्घटना घडली. ध्यान करण्यासाठी सागर सोहळा परिधान करून बसलेला होता. यावेळी काही अंतरावर पडलेल्या दिव्यातील तेलाबरोबर वाहून आलेल्या अग्निमुळे त्याच्या सोहळयाने पेट घेतला. काही कळण्याच्या आत तो गंभीर भाजला गेला. त्याने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरीकांनी धाव घेतली असता ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.