सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील मेंढी येथील शेतकरी बाळू जयराम गिते (६०) यांचा वीज पडून मृत्यू झाला. ते शनिवारी सायंकाळी ६ वाजता मेंढी शिवारात शेतात जनावरांना चारा आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या अंगावर शेतात असताना वीज पडली.
या अगोदर चार दिवसापूर्वी नांदगाव तालुक्यातील तांदूळवाडी येथील एका ६० वर्षीय शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. शेतात काढून ठेवलेले कांदे झाकण्यासाठी हा शेतकरी शेतात गेला असता अंगावर वीज पडून जागीच ठार झाला. नाना गमन चव्हाण (६० ) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
झाडावर वीज पडल्याने नारळाच्या झाडाने पेट घेतला
पंधरा दिवसापूर्वी मनमाड शहरात रात्री आठ ते साडे आठ वाजेच्या दरम्यान अचानक विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यावेळी शहरातील वसंत हौसिंग सोसायटी मधील एका बंगल्यातील नारळाच्या झाडावर वीज पडल्याने नारळाच्या झाडाने पेट घेतला होता. १५ ते २० मिनिट झालेल्या जोरदार पावसाने वीजपुरवठा खंडित झाला होता.
गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील बहुतांश भागात गारपीट व अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.