सिन्नर तालुक्यात दोन वेगळ्या घटनेत आत्महत्या
सिन्नर – तालु्क्यातील देवपुर शिवारात गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. अनिल गडाख (२५) या तरुणाने आपल्या राहत्या घराशेजारी कांद्याच्या चाळीमध्ये गळफास घेतला. नातेवाईंकानी त्यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ्क्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी चंद्रभान मुरलीधर गडाख (५४) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक जगताप करत आहेत.
बसस्थानक परिसरातून दुचाकी लांबवली
सिन्नर – सिन्नर बसस्थानक परिसरातील अभिषेक कृषी केंद्र या दुकानासमोर लावलेली दुचाकी लांबवल्याची घटना घडली आहे. अमोल सतिष बोडके (३०) रा. वडझिरे हे कामानिमित्त शहरात आले असता त्यांनी आपली प्लॅटिना दुचाकी अभिषेक दुकानासमोर लावून कामासाठी गेले होते. काम आटोपून दुचाकीजवळ आले असता त्यांना दुचाकी सापडली नाही. त्यांनी आसपास शोध घेऊनही दुचाकी न सापडल्याने त्यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात येत अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीची फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास पोलिस नाईक मोरे करत आहेत.
देवपूरमध्ये धाडसी घरफोडी
सिन्नर- तालुक्यातील देवपूर येथे दोन अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत ३४ हजारांचा माल लांबवल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. सुनिल रामराव गडाख (४९) हे आपली पत्नी, मुलगा, मुलगी यांच्यासोबत झोपलेले असताना पहाटेच्या सुमारास दोन चोरट्यांनी कटवणीच्या साहाय्याने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट अलगद उघडत २४ हजार रोख, १० हजारांचे अडीच तोळ्याचे दागिने चोरत असताना गडाख यांच्या मुलीने दोघांना बघताच आरडाओरडा केल्याने त्यांनी रोख रक्कम व दागिने घेऊन पळ काढला. गडाख यांनी पाठलाग केला असता चोरटे दुचाकीवरून पसार झाले. गडाख यांनी याबाबत तात्काळ एमआयडीसी ,मुसळगाव पोलीस ठाण्यात येत चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली.