नाशिक – सिन्नर येथील घरफोडी आणि चोरीचा उलगडा अखेर झाला आहे. याप्रकरणी भंगार दुकानदारास अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक २ ने अतिशय हुशारीने या गुन्हेगारांचा छडा लावला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिन्नर येथे घरफोडी करून चोरीस गेलेल्या मुद्देमाल आणि चोरांना पकडण्याचे आवाहन पोलिसांसमोर होते. त्याचा तपास करीत असताना गुन्हेशाखा युनिट-०२ नेमणुकीचे पोलीस हवालदार प्रकाश भालेराव यांना माहिती मिळाली की आज १८ डिसेंबर रोजी जेलमधुन पसार झालेला अजय राजु वाघेला व त्याचा साथीदार करण वाघेला हे चोरीचा माल विकण्यासाठी पाथर्डी – वडनेर दुमाला रोडवरील भंगारचे दुकानात येत आहे.
सदर बातमी भालेराव यांनी त्वरित पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना देवून त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्ष कविजय लोंढे,पोलीस उपनिरीक्षक पोपट कारवाळ, अनिल लोंढे, सुगन साबरे, शंकर काळे, देवकिसन गायकर, गुलाब सोनार, ठाकुर, सुनिल आहेर, प्रशांत वालझाडे, यादव डंबाळे आदी कर्मचारी मिळालेल्या बातमीतील पाथर्डी शिवारातील, वडनेरदुमाला रोडवर असलेल्या भंगार दुकानाजवळ पोहोचले. त्याचवेळी पोलीसांची गाडी लांबून दिसताच दुकानासमोर मोटार सायकलवर असलेले दोन इसम मोटार सायकल तेथेच सोडून शेतामध्ये पळून गेले. तात्काळ पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. परंतु झाडाझुडपाचा फायदा घेवून ते पसार झाले.
पथकाने पुन्हा भंगार दुकानात येवून भंगार दुकानदारास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव इस्राईल अहमद शेख, रा. सुभाषरोड, मटनमार्केट समोर, पवारवाडी, नाशिकरोड, नाशिक असे सांगीतले. पळून गेलेल्या इसमांनी दुकानासमोर सोडलेल्या मोटार सायकल बाबत तसेच पळून गेलेल्या दोन इसमांबाबत त्यास विचारपुस करता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु त्यांचे एकंदरीत हालवाली संशयास्पद वाटल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याचया खिशात एक दागिणे ठेवण्याची पर्स मिळाली.
ती ताब्यात घेवून उघडुन पहाता त्यामध्ये ९१४०/- रू किमतीचे चे बेनटेक्सची पोत, नथ तसेच चांदीचे तोरडया, तोडबंदी, जोडवे असे दागिणे, ५०००/-रु भरणा केल्याची बँक ऑफ महाराष्ट्र खाते क्रमांक ०६०८२०२१ असलेली पावती मिळून आली असुन त्यावर गायत्री रावसाहेब बिडगर यांचे नाव होते. त्याबाबत इस्राईल अहमद शेख यास विचारपुस करता त्याने सदरचे दागिणे आताच पळून गेलेले इसम नामे अजय राजु वाघेला व करण वाघेला यांनी त्यास विकल्याचे सांगीतले. दुकानाची पहाणी करता सदर ठिकाणी भंगारच्या साहित्यामध्ये न शोभणारा सुस्थीतीतील एक एल. जी. कंपनीचा एल.सी.डी व होम थिएटर दिसून आले.
त्याबाबत त्यास विचारता सदर टि.व्ही व होम थिएटर, व आरोपी सोडून पळालेली मोटार सायकल ही वरील आरोपीतांनी सिन्नर येथुनच चोरी करून आणल्याचे सांगीतले त्यावरून पोलिसांनी ते ताब्यात घेतले. तसेच ६०,०००/- रु कि.ची मो. सा. एचएफ डिलक्स काळ्या रंगाची, तिचेवर एमएच ४१ ओएच ९६१७ क्रमांक असलेली मोटार सायकल, २५,०००/-रुकि.वा. एल. जी. कंपनीवा ३२ इंची एल. सी.डी.टि.व्ही, ०७,०००/-रुकि. चा आयबॉल कंपनीचे होम थिएटर असा एकुण सिन्नर येथील घरफोडी व चोरीतील १,०१,३४०/-रू कि.दे. असा मुद्देमाल भंगार दुकानदार इसाईल अहमद शेख, रा. सुभाषरोड, मटनमार्केट समोर, पवारवाडी, नाशिकरोड, नाशिक याच्याकडून ताब्यात घेतले.
दुकानदाराने सदरचा मुद्देमाल चोरीचा असल्याचे माहित असुनही विकत घेतल्याने व सदर बाबत सिन्नर पोलीस ठाणे येथे चौकशी करता तेथे घरफोडी, चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे समजल्याने त्यास व जप्त मुददेमाल ताब्यात घेवुन पुढील कारवाई कामी सिन्नर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. सदरची कामगीरी पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांचे मार्गदर्शना खाली गुन्हेशाखा युनिट कं. २ कडील अधिकारी व अंमलदार पोलीस उपनिरीक्षक विजय लोंढे,पोलीस उपनिरीक्षक पोपट कारवाळ,पोलीस हवालदार प्रकाश भालेराव, अनिल लोंढे, सुगन साबरे, शंकर काळे, देवकिसन गायकर, गुलाब सोनार ठाकुर, सुनिल आहेर, प्रशांत वालझाडे, यादव डंबाळे यांनी केलेली आहे.