नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): राज्य परिवहन महामंडळातर्फे सिन्नर बसस्थानकास प्राप्त झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील पाच नवीन बसेसचे लोकार्पण राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यापूर्वी सिन्नर बसस्थानकास पहिल्या टप्प्यात राज्य परिवहन महामंडळाकडून ५ नवीन बस एप्रिल महिन्यात प्राप्त झाल्या आहेत. लोकार्पण प्रसंगी विभाग नियंत्रक श्रावण सोनवणे,आगर व्यवस्थापक हेमंत नेरकर, बस स्थानक प्रमुख सुरेश पवार, वाहतूक निरीक्षक जयवंत चोपडे यांच्यासह बस चालक, वाहक व कर्मचारी आदी उपस्थित होते.
मंत्री ॲड कोकाटे यांनी बसमध्ये आसनस्थ होत बसेसला मार्गस्थ केले.