सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नर-घोटी महामार्गावर सोनांबे शिवारात असलेल्या आई भवानी डोंगराला दुपारी ४ च्या सुमारास आग लागली. मात्र स्थानिक ग्रामस्थांसह वनप्रस्थ फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी अथक प्रयत्नातून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. त्यामुळे अनेक झाडे वाचली. त्यामुलेच फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सिन्नर-घोटी महामार्गावर सोनांबे शिवारात डोंगरावर आई भवानी मातेचे मंदिर असून हा संपूर्ण डोंगर आई भवानी डोंगर नावाने ओळखला जातो. वनप्रस्थ फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी गेल्या पाच-सहा वर्षांपासून या परिसरात विविध प्रकारची सुमारे ६ हजाराहून अधिक झाडे लावलेली असून फाऊंडेशनच्या वतीने त्याची निगा राखली जाते. या वृक्षवलीमुळे भवानी डोंगराला साजेसे रूप आले आहे. काल दुपारच्या सुमारास अज्ञात कारणाने या डोंगराच्या पायथ्याला आग लागली. वान्यामुळे आगीचा फैलाव होऊ लागला काही वेळातच बराचसा डोंगर आगीने व्यापला होता. डोंगराजवळ वास्तव्यास असलेल्या चंद्रकला फोडसे या हिरकणी सारख्या डोंगरावर घावन आग विझवण्यास सुरुवात केली. सदरची बाब सोनांबे येथील जय भवानी लॉन्सचे संचालक सोपान बोडके व स्थानीक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर सोपान बोडके यांनी वनप्रस्थ फाउंडेशनच्या स्वयंसेवकांना माहिती देताच सिन्नर येथून स्वयंसेवक दत्तात्रय बोऱ्हाडे राजाभाऊ क्षत्रिय, अनिल जाधव, डॉ. महावीर खिंवसरा, सोपान बोडके, संतोष कमलु सावजी यांनी भवानी डोंगराकडे धाव घेतली.
फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांसह स्थानिक नागरिक जगदीश बोडके, रानु घोडे, छोटा कार्यकर्ता कुणाल बोडके वनक्षेत्रपाल कैलास सदगीर, बाबुराव सदगीर, शब्बीर पठाण, चंद्रकला फोडसे, चंद्र फोडसे आदींनी बारदानाच्या गोण्या ओल्या करून आग विझविण्याचा प्रयत्न सुरु केला. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण आणता आले. वेळेवर आग विझवण्यात यश आल्यामुळे डोंगरावर बनप्रस्थ फाऊडेशनद्वारे लावण्यात आलेल्या वृक्षांचे संवर्धन, अनेक पश पक्षी, सरपटणारे प्राणी यांचे जीवन सुरक्षित राहण्यास मदत झाली व मोठी हानी टळली. डोंगरावरील आग विजवण्यात सर्वाधिक महत्वाची भूमिका घेणारी “सोनांबे गावची हिरकणी” चंद्रकलाबाई हिने सर्वाधिक मदत केली. तसेच सोपान भाऊ बोडके व ग्रामस्थ सर्व स्वयंसेवक यांचे सतर्कतेमुळे होणारा मोठा अनर्थ टळला सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद वनप्रस्थ टिमने केले