नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेतनाचा फरकाची फाईल मंजूर करून आणून तो फरक काढून देण्याच्या मोबदल्यात सिन्नर तालुक्यातील रामनगर येथील आश्रमशाळेतील मुख्याध्यापक सुनील वसंत पाटील व शिपाई बाळू हिरामण निकम हे पाच हजाराच्या लाच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अडकले.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, आरोपी लोकसेवक हे प्राथमिक आश्रमशाळा रामनगर येथे मुख्याध्यापक आहेत त्यांनी फिर्यादी यांच्या २०१६ ते २०२३ पर्यंतच्या वेतनाचा फरकाची फाईल मंजूर करून आणून तो फरक काढून देण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयाची मागणी केली व आरोपी शिपाई यांच्याकडे देण्यास सांगितली ती मुख्याध्यापक यांच्या प्राथमिक आश्रमशाळा ,रामनगर येथील कार्यालयात पंच व साक्षीदारा समक्ष स्विकारले आहेत, म्हणून दोन्ही आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*यशस्वी सापळा कारवाई
*युनिट – नाशिक
*तक्रारदार- पुरुष, वय- ४८ वर्ष.
आरोपी-
1) सुनिल वसंत पाटील, वय -54
पद – मुख्याध्यापक ,प्राथमिक आश्रमशाळा रामनगर ता. सिन्नर जिल्हा .नाशिक
2)बाळू हिरामण निकम,वय 55
पद – शिपाई ,प्राथमिक आश्रम शाळा ,रामनगर , ता. सिन्नर,जिल्हा – नाशिक.
*लाचेची मागणी- 5000/- रुपये
*लाच स्विकारली- 5000/- रुपये
*हस्तगत रक्कम- 5000/- रुपये
*लाचेची मागणी – दि. 31/07/24
*लाच स्विकारली – दि.13/08/24
तक्रार:- यातील आरोपी लोकसेवक हे प्राथमिक आश्रमशाळा रामनगर येथे मुख्याध्यापक आहेत त्यांनी फिर्यादी यांच्या 2016 ते 2023 पर्यंत च्या वेतनाचा फरकाची फाईल मंजूर करून आणून तो फरक काढून देण्याच्या मोबदल्यात 5000 रुपये ची मागणी केली व आरोपी लोकसेवक क्रमांक 02 यांच्याकडे देण्यास सांगितली ती आरोपी लोकसेवक 01 यांच्या प्राथमिक आश्रमशाळा ,रामनगर येथील मुख्याध्यापक यांचे कार्यालयात पंच व साक्षीदारा समक्ष स्विकारले आहेत, म्हणून दोन्ही आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
सापळा व तपास अधिकारी –
*राजेंद्र सानप, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक मोबा.नं.8208971207*
सापळा पथक
पोहवा/ प्रफूल्ल माळी
पोहवा/ संतोष गांगुर्डे
पोना/विलास निकम