सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील पाथरे येथे कल्याण अंबरनाथ येथून शिर्डी कडे जाणाऱ्या गाईड ट्रॅव्हल्स कल्याण या खाजगी ट्रॅव्हल बस गाडीला समोरासमोर आयशर ट्रकची धडक झाल्यानंतर १० जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यात सात मृत प्रवाशांची ओळख पडली आहे. तर गंभीर जखमी असलेल्यां १६ जणांची नावे समोर आली आहे. ही घटना आज सकाळी सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान शिर्डी सिन्नर महामार्गावर घडली. घटनास्थळी १० व्यक्तींचा मृत्यू झालेला असून उर्वरित तीस ते पस्तीस जखमी व्यक्तींना सिन्नर येथील मातोश्री हॉस्पिटल, सदगीर हॉस्पिटल ,यशवंत हॉस्पिटल येथे हलविण्यात आलेले आहे. या अपघातातील सात मृत प्रवाशांची ओळख पटली असून यामध्ये दीक्षा गोंधळी, प्रतीक्षा गोंधळी, श्रावण भारस्कर, श्रद्धा भारस्कर, नरेश उबाळे, वैशाली नरेश उबाळे, बालाजी कृष्णा मोहंती (ड्रायव्हर) अशी मृत प्रवाशांची नावे आहेत.
यशवंत हॉस्पिटल सिन्नर
१ निधी उबाळे (वय ९ )
२ माया किशोर जाधव (वय ३५)
३ प्रशांत मेहती (वय ३५)
४ सीमा सुहास लोले (वय ४०)
५ सपना कन्हैया डांगे (वय २८)
६ हर्षद राजेश वाडेकर (वय १४)
७ धनिशा संदेश वाडेकर (वय ६)
८ श्रविण्या सुहास बारकर (वय ५)
९ आशा जयप्रकाश जयस्वाल (वय ४३)
१० जिगर कहर (वय १३)
११ बबली देवी कहर (वय ३३)
१२ योगिता संदेश वाडेकर
१३ रंजना प्रभाकर पोटले (वय ४०)
१४ सुप्रिया उर्फ मयुरी महेश बहीहित
१५ शृनिका संतोष गोंधळे (वय ४२)
१६ वर्षाराणी बेहेरा (वय ३१)