सिन्नर ( इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरे गावाच्या जवळ प्रवाशांना घेऊन जाणारी भरधाव बस (एम.एच ०४ एफके २७५१) उलटल्यानंतर प्रशासनाने या अपघाताची अधिकृत माहिती दिली आहे. या माहितीत बसमध्ये किती प्रवाशी होते, मृत्यूचा आकडा व अपघात ग्रस्तांवर कोणत्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगितले आहे.
या भीषण अपघातात :–
एकूण प्रवाशी-४५
मृत्यू-१०
ओळख पटलेले-०७
अनोळखी-०३
अपघात ग्रस्तांवर पुढील रुग्णालयात उपचार सुरू
मातोश्री हॉस्पिटल-०३
डॉ. साळुंखे हॉस्पिटल-०१
यशवंत हॉस्पिटल-१६
एकूण- २० प्रवाशांवर उपचार सुरू असून
सिन्नर रुग्णालयातून चार प्रवाशांना उपचार नंतर सोडण्यात आले आहे.
बस व ट्रकची समोरासमोर धडक
नाशिक – सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ खासगी ट्रॅव्हल बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला आहे. बस व ट्रकची समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की बस आणि ट्रक यांचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. या भीषण अपघातात तब्बल १० जण ठार झाले आहेत. तर २० जण गंभीर जखमी झाले आहेत.