सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाथरे शिवारात पाच मित्र सायकलवरून शिर्डीस जात असताना पाठीमागून येणाऱ्या महिंद्रा कारने धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन सायकल स्वार किरकोळ जखमी झाले. सिन्नर येथील लोंढे गल्लीतील पाच मित्र सायकलवरून शिर्डीस जात असतांना हा भीषण अपघात शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या दरम्यान झाला. या अपघातात आदित्य महेंद्र मिठे व कृष्णा संतोष गोळेसर हे सायकलस्वारांचा मृत्यू झाला.
शिर्डीला जातांना हे पाचही सायकल स्वार रस्त्याच्या डाव्या बाजूने एका मागे एक असे जात होते. अचानक मुंबई विरारहून शिर्डीकडे जाणाऱ्या महिंद्रा कारने दोन सायकल स्वरांना जोरदार धडक दिली त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हा अपघात झाल्यानंतर पाथरे शिवारातील गणेश रोडे जगदीश जोर्वेकर सचिन चिने, सुनील चिने, संजय गायकर, कैलास एरंडे, तेजस चिने आदींनी रुग्णवाहिका बोलावली. त्यानंतर मृतांना व जखमींना रुग्णवाहिकेतून पांगरी येथील रुग्णवाहिकेला नेण्यात आले. त्यानंतर येथून या सर्वांना सिन्नर येथे पाठवण्यात आले. कारमधील किरकोळ जखमी प्रवासी मुंबईचे असल्याने त्यांनी मुंबईतच उपचार घेण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना मुंबईला पाठवण्यात आले.