नवी दिल्ली – केंद्र सरकारने जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लशीला मंजुरी दिली आहे. आतापर्यंत देशात कोरोनासाठी दोन डोसच्या लशी होत्या. पण, आता एक डोसची लस उपलब्ध होणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती ट्विट करुन सांगितली आहे. या ट्विट मध्ये त्यांनी म्हटले आहे की, India expands its vaccine basket! जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल-डोस कोविड -19 लशीला भारतात आणीबाणीच्या वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. आता भारताकडे 5 EUA लस आहेत.यामुळे कोविड विरुद्ध आपल्या देशाच्या सामूहिक लढाईला आणखी चालना मिळेल.
https://twitter.com/mansukhmandviya/status/1423915409791610886?s=20