इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आयुष्याच्या एका उंबरठ्यावर जोडीदारासोबत आयुष्य व्यतीत करण्याची सर्वांची इच्छा असते. आयुष्यात लग्न केल्यावर नवरा, मुलं संसार यांच्यात रमावं असं सर्वानाच वाटत असत. मात्र, काही कारणाने मोडलेला संसार अभिनेत्रींनी पुन्हा सुरू न करता एकटीनेच प्रवास सुरू ठेवला आहे. मराठी मनोरंजन सृष्टीतल्या अशा काही अभिनेत्रींविषयी आपण जाणून घेऊया.
‘बिग बॉस सीजन ४’ मधील स्पर्धक अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने २०१४ मध्ये प्रेमविवाह केला होता. सलग ८ वर्षे तिने रोहन देशपांडे याला डेट केल्यानंतर त्याच्याशी लग्न केले होते. मात्र काही महिन्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेने घराघरात पोहोचलेल्या तेजश्री प्रधान – शशांक केतकर या जोडीला चांगलेच प्रेम मिळाले होते. त्यानंतर त्या दोघांनी २०१४ मध्ये लग्न देखील केले. मात्र वर्षभरातच ते विभक्त झाले.
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने देखील २०१२ मध्ये आपला बालमित्र भूषण भोचे याच्याशी नाते जोडले. काही महिन्यांनंतर तेही विभक्त झाले. ‘बिग बॉस मराठी’ सीजन ३ मध्ये स्पर्धक असलेली अभिनेत्री स्नेहा वाघ ही तिच्या वेगळ्या स्टाईलमुळे ओळखली गेली. स्नेहाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. २००७ मध्ये तिचं अविष्कार दारव्हेकरसोबत लग्न झाले होते. मात्र त्या दोघांचे काही पटले नाही आणि ते वेगळे झाले. यानंतर स्नेहाने २०१५ साली अनुराग सोलंकी याच्याशी लग्न केले मात्र संसार काही तिच्या नशिबी नव्हता आणि अनुराग बरोबर देखील तिचा घटस्फोट झाला.
‘आई कुठे काय करते’ मध्ये खलनायिका म्हणून उत्तम भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्री रुपाली भोसले हिचं २०१२ मध्ये मिलिंद शिंदे याच्याशी लग्न झालं होत. मात्र काही काळातच त्यांचा घटस्फोट झाला. अभिनेत्री मानसी साळवी हिचे हेमंत प्रभू यांच्याबरोबर २००५ मध्ये लग्न झालं होत. मात्र ११ वर्षे संसार केल्यावर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
Single Actress After First Marriage Break