मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रसिद्ध गायिका आणि सारेगमप या शो मधील महागायिका वैशाली भैसने-माडे हिने आज एक धक्कादायक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ती म्हणते आहे की, काही लोकांकडून माझ्या जिवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जातो. यासंदर्भात दोन दिवसांनी मी पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करणार आहे. आज मला तुमच्या सपोर्टची गरज आहे, असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. तिच्या या पोस्टवर राज्यभरातून प्रतिक्रीया उमटत आहेत. खासकरुन तिच्या चाहत्यांकडून तिला काळजी घेण्याचे आणि पोलिसात तक्रार देण्याचे सांगितले जात आहे. तिला नक्की कुणापासून धोका आहे, काय नक्की घडले आहे यासंदर्भात तर्कवितर्क लढविले जात आहेत.
तिने शेअऱ केलेली पोस्ट अशी