मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रसिद्ध गायक सोनू निगम याला ठाकरे गटातील आमदाराच्या मुलाने धक्काबुक्की केल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी सोनू निगमने पोलिसात तक्रार केली आहे. काल मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. सेल्फीच्या बहाण्यातून हा सर्व प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, आमदाराच्या मुलाला सोनू निगमसोबत फोटो काढायचा होता, म्हणून तो स्टेजवर चढला. परंतु सोनू टीमने त्याला मज्जाव केला असता स्वप्निल आणि त्याचे कार्यकर्ते भडकले. सोनू स्टेजवरून खाली उतरत असताना त्याने गायकाला स्टेजच्या मागच्या पायऱ्यांकडे ढकलले. या प्रकरणी पोलिसांनी स्वप्निल फातर्पेकर याच्यावर गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू आहे अशी माहिती झोन ६ चे डीसीपी हेमराज सिंग राजपूत यांनी दिली. घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. या संपूर्ण घटनेदरम्यान ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गायक आणि त्याच्या अंगरक्षकाला मारहाण केली. सोनू निगम याला वाचवताना त्याचा अंगरक्षक आणि गायक मित्र रब्बानी खान हे दोन जण जखमी झाले, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
https://twitter.com/thakkar_sameet/status/1627718174182612992?s=20
कॉलर पकडण्याचा प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा सोनू निगमसोबत स्टेजवर झटापट सुरू होती. तेव्हा त्याच्या अंगरक्षकाने सोडवण्याचा प्रयत्न केला. सोनू निगमला ढकलले असता अंगरक्षक मध्ये आला तेव्हा त्यालाही धक्का दिल्याने तो पायऱ्यांवरून खाली पडला. दरम्यान, या व्यक्तीने पुन्हा सोनूला कॉलरने पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचा सहकारी गायक रब्बानी खान याने सोनूला वाचवण्यासाठी मध्यस्थी केली. त्यानंतर त्या हल्लेखोराने रब्बानी खान यांनाही जोरात ढकलले आणि तोदेखील पायऱ्यांवरून ७ फूट खाली जमिनीवर पडला. सुदैवाने, या झटापटीत सोनू निगमला दुखापत झाली नाही, परंतु त्याचा अंगरक्षक आणि गायक मित्र रब्बानी खान जखमी झाले.
https://twitter.com/SuryaRavane/status/1627854108253380609?s=20
Singer Sonu Nigam Complaint Against MLA Son