विशेष प्रतिनिधी, मुंबई
काही दिवसांपूर्वीच मुलाला जन्म देणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिने कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. विशेष म्हणजे, ज्या महिलांचा नुकतीच प्रसुती झाली आहे त्यांनी लस घ्यावी की नाही याबाबत अनेकांमध्ये मोठा संभ्रम आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे अशा महिला लस घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. मात्र, श्रेया घोषालने आपल्या या कृतीतून तिच्या चाहत्यांसह देशवासियांमध्ये मोठा संदेश दिला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच मी डोस घेत आहे. नर्सिंग मदरने लस अवश्य घ्यावी, असा सल्लाही तिने दिला आहे.
बघा ती काय म्हणते आहे
https://www.facebook.com/shreyaghoshal/videos/1214678479002843/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C