मुंबई – सुप्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र हिने काही दिवसांपूर्वीच गोंडस कन्येला जन्म दिला होता. त्याची गोड वार्ता तिने सोशल मिडियात पोस्टद्वारे दिली होती. याच कन्येचे बारसे आता करण्यात आले आहे. आपल्या या कन्येचे नाव तिने शार्वी असे ठेवले आहे. या शब्दाचा अर्थ नक्की काय आहे हे सुद्धा सावनीने सांगितले आहे. शार्वी हे पा्र्वती देवी आणि दुर्गा देवीचे नाव आहे. तसेच, या नावाचा अजून एक अर्थ म्हणजे दिव्य-दैवी असाही आहे हे सुद्धा तिने स्पष्ट केले आहे. आमच्या बाळाच्या पाठिशी तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा सदैव राहू देत, अशी विनंतीही तिने केली आहे.
सावनीची फेसबुक पोस्ट अशी
https://www.facebook.com/100009438667232/posts/3089733128017946/