इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सारेगमप लिटिल चॅम्प्समधील मोदक अर्थात सर्वांचा लाडका प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन या दोघांनी ‘आमचं ठरलंय’ असं जाहीर केलं, आणि सोशल मीडियावर या ना त्या निमित्ताने सध्या तेच चर्चेत असलेले दिसतात. सध्या प्रथमेशचा डाएट प्लॅन माध्यमांमध्ये गाजतो आहे. विशेष म्हणजे कोणतीही जिम किंवा खाण्याच्या पदार्थांमध्ये फार बदल न करता, प्रथमेशने आपले १४ किलो वजन घटवले आहे.
लिटिल चॅम्प्स कार्यक्रमात अगदी गोंडस गुटगुटीत असलेला प्रथमेश आता जरा बारीक दिसतो आहे. अर्थातच यासाठी त्याने विशेष मेहनत घेतली आहे, पण वेगळं काही केलेलं नाही. रोजच्या आहारात ठरावीक पदार्थ आणि नियमित व्यायाम यामुळे प्रथमेशने ही किमया साधली आहे. प्रथमेश खवय्या आहे. पण त्याबरोबरच तो काय खावे याचीही काळजी घेतो. आपलं जमल्याचं जाहीर केल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांच्या मुलाखती सुरू आहेत. अशाच एका मुलाखतीत त्याने आपल्या बारीक होण्याचं गुपित सांगितलं आहे.
प्रथमेशचे डाएट
चोखंदळ खवय्या असला तरी प्रथमेश तब्येतीसाठी आवश्यक ते सगळे नियम पाळतो. त्याचं डाएट आयुर्वेदिक आहे. त्याचा भाऊ आयुर्वेदिक डॉक्टर असल्याने, त्याचाच सल्ला प्रथमेश घेतो. आयुर्वेदात दिनश्चर्या आणि ऋतूचर्या अशा दोन व्याख्या आहेत. त्यानुसार तो आहारात बदल करत असतो. त्यानं मैदा खाणं बंद केलं आहे. शिवाय रात्री उशीरा जेवणंही प्रथमेश टाळतो. कधीकधी गाण्याच्या कार्यक्रमाने त्याला उशीर होतो आणि गायल्याने चांगलीच भूक लागलेली असते. अशावेळी तो उपमा किंवा खिचडीसारखे हलके अन्न खातो. त्याच्यासारखच डाएट मुग्धाही फॉलो करते.
तर व्यायामाविषयी सांगताना प्रथमेश म्हणतो, तो कधीच जिमला जात नाही. तो पारंपरीक व्यायम म्हणजे सूर्यनमस्कार, दोरीच्या उड्या, चालणे, प्राणायाम असे व्यायाम प्रकार करतो.