इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नेहमीच्या पठडीतला नसला तरीही गायक मिका सिंग याचेही बरेच चाहते आहेत. आपली वेगळी शैली टिकवून ठेवत त्याने चाहत्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. सध्या त्याच्या एका गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर फारच व्हायरल होतो आहे. लोकांनी ते फारच डोक्यावर घेतलं आहे. त्याच्या गाण्याला डोक्यावर घेतलं ही बातमी नाही, तर बातमी ही आहे की, अवघ्या १० मिनिटांच्या या गाण्यासाठी मिकाने तब्बल दीड कोटी मानधन घेतल्याचं समजतंय.
उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा नुकताच राधिका मर्चंटशी साखरपुडा झाला. राजेशाही थाटात हा सोहळा पार पडला. या सोहळ्याची जितकी चर्चा आहे तितकीच चर्चा या कार्यक्रमातील मिका सिंगच्या गाण्याची होते आहे. होय, याच कार्यक्रमात मिका सिंगने हे गाणं सादर केलं आहे.
मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानी पहिल्यांदाच तिच्या जुळ्या मुलांना घेऊन भारतात आली. घरी आल्यावर तिचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यापाठोपाठच ईशाचा जुळा भाऊ अनंत अंबानीचा साखरपुडा सोहळा झाला. साखरपुड्यात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या कलाकारांनी त्यांची कलाही सादर केली. याच समारंभात मिका सिंग यानेही गाणं गायलं. हे गाणं गाण्यासाठी त्याने करोडो रुपये आकारल्याचं समोर आलं आहे. या कार्यक्रमातला मिका सिंगच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याने हा कार्यक्रमात १० मिनिटांचं सादरीकरण केलं. पण या १० मिनिटाच्या सादरीकरणासाठी त्याने १.५ कोटी रुपये आकरले आहेत.
अनंत आणि राधिका अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. अंबानी कुटुंबातील प्रत्येक सोहळ्यात राधिका आवर्जून उपस्थित राहते. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्याचप्रमाणे आता मिका सिंगने या सोहळ्यात गाण्यासाठी घेतलेल्या मानधनाच्या आकड्यानेही सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
Singer Mika Singh Amount Sing a Song in Anant Ambani Engagement
Honorarium Fees Charges 10 Minutes